रेल्वेच्या मेगा ब्लॉक;  १२, १९ रोजी इंद्रायणी एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द

By appasaheb.patil | Published: January 11, 2019 11:44 AM2019-01-11T11:44:09+5:302019-01-11T11:48:26+5:30

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर सेक्शनमधील दौंड-कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी १२ व १९ जानेवारी या दोन ...

Mega block of railway; On 12th, 19th, there are many trains with Indrayani Express canceled | रेल्वेच्या मेगा ब्लॉक;  १२, १९ रोजी इंद्रायणी एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द

रेल्वेच्या मेगा ब्लॉक;  १२, १९ रोजी इंद्रायणी एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द

Next
ठळक मुद्देअन्य रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदलट्रॅकच्या कामासाठी १२ व १९ जानेवारी या दोन दिवसांकरिता ब्लॉक घेण्यात आलामागील काही दिवसांपासून दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील दौंड-सोलापूर सेक्शनमधील दौंड-कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी १२ व १९ जानेवारी या दोन दिवसांकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य गाड्या रद्द करण्यात आल्या  असून अन्य रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मागील काही दिवसांपासून दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे़ या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून कामाच्या निमित्ताने ब्लॉक घेण्यात येत आहे़ या ब्लॉकदरम्यान धावणाºया रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे़ ब्लॉकदरम्यान धावणारी गाडी क्रमांक १२१६९ व १२१७० पुणे-सोलापूर-पुणे    एक्स्प्रेस १२ व १९ जानेवारी रोजी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, भिगवण-वडशिंगे रेल्वे स्थानकादरम्यान एकेरी लाईन सेक्शनमध्ये ट्रॅकच्या कामासाठी ३ डिसेंबर २०११ ते १ जानेवारी २०१९ या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला होता़ ३० दिवसांच्या विश्रांतीनंतर १ जानेवारी रोजी रुळावर आलेल्या इंद्रायणीला दोन दिवसांच्या आत  पुन्हा एक दिवसाचा ब्रेक लागला होता़ पुन्हा सुरळीत सुरू झालेल्या इंद्रायणी गाडीला १२ व १९ जानेवारी या दोन दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे़ दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने सोलापूर मार्गावर दिवसा धावणारी व सोलापूरकरांसाठी सोयीची            असलेली प्रवासी रेल्वे गाडी पुन्हा एकदा बंद केल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे़ इंद्रायणी रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

 

या गाड्यांच्या वेळेत व मार्गात बदल

  • - ७१४१४ सोलापूर-पुणे डेमू पॅसेंजर ही गाडी सोलापूर ते माढ्यापर्यंत धावणार आहे. परंतु १९ जानेवारी रोजी अनगर स्टेशनपर्यंत धावेल़ भिगवण ते पुणेदरम्यान धावणार आहे. मात्र गाडी क्रमांक ७१४१४ ही गाडी माढा ते भिगवणदरम्यान धावणार नाही़
  • - ७१४१५ पुणे-सोलापूर डेमू पॅसेंजर ही गाडी पुणे ते भिगवणपर्यंत धावणार आहे़ माढा ते सोलापूरपर्यंत व नंतर १९ जानेवारी रोजी अनगर ते सोलापूरदरम्यान पुन्हा धावेल़ ही गाडी भिगवण ते माढ्यादरम्यान धावणार नाही़
  • - गाडी क्रमांक ७१४१३ डेमू पुणे-सोलापूर पॅसेंजर ही गाडी आपल्या निर्धारित वेळेत धावेल़
  • - गाडी क्रमांक १७०१४ हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस ही गाडी निर्धारित स्थानकापर्यंत न धावता हैदराबाद ते कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत धावणार आहे़
  • - गाडी क्रमांक १७०१४ हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस गाडी कुर्डूवाडी ते पुणे स्टेशनदरम्यान धावणार नाही़
  • - गाडी क्रमांक १७०१३ पुणे ते हैदराबाद एक्स्प्रेस गाडी पुणे ते कुर्डूवाडी स्टेशनदरम्यान धावणार नाही़

या गाड्या उशिराने धावणार

  • - गाडी क्रमांक ११३०१ मुंबई-बेंगलूर उद्यान एक्स्प्रेस, दौंड-सोलापूर स्थानकादरम्यान १ तास उशिराने धावणार आहे़
  • - गाडी क्रमांक ११३०२ बेंगलूर-मुंबई उद्यान एक्स्प्रेस दौंड-सोलापूर स्थानकादरम्यान १ तास उशिराने धावणार आहे़
  • - गाडी क्रमांक १६३४० नागरकॉईल-मुंबई एक्सा्रेस दौंड ते सोलापूर स्थानकादरम्यान १ तास उशिराने धावणार आहे़
  • - गाडी क्रमांक १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम ही गाडी दांैड ते सोलापूर स्थानकादरम्यान २ तास उशिराने धावणार आहे़ 

दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी सोलापूर विभागात रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येत आहे़ यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळेत व मार्गात बदल करण्यात आला आहे़ या कामी रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे व झालेल्या बदलाची नोंद घ्यावी़
- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर

Web Title: Mega block of railway; On 12th, 19th, there are many trains with Indrayani Express canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.