जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती सदस्यपदी प्रा. सुहास पाटील यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:15 AM2021-07-09T04:15:19+5:302021-07-09T04:15:19+5:30
भीमानगर : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती सदस्यपदी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील यांची नियुक्ती करण्यात ...
भीमानगर : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती सदस्यपदी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती पत्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सहीने मिळाले आहे.
प्रा. सुहास पाटील यांची निवड खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. त्याबरोबरच भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माळशिरसचे के, के. पाटील, करमाळ्याचे गणेश चिवटे या सदस्यांचीही नियुक्ती समिती सदस्य म्हणून झाली आहे. या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्याअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत ३२ विविध योजनांचा समावेश होतो. या समितीच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी, निधीचे समान वाटप, नियंत्रण व देखरेख करण्याचे काम होत असते. या समितीमध्ये जिल्ह्यातील खासदार अध्यक्ष व सहअध्यक्ष म्हणून पदसिद्ध असतात. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---
फोटो : ०७ सुहास पाटील