सोलापुरातील शिवसैनिक झाले भाजपचे सदस्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 02:22 PM2019-04-09T14:22:20+5:302019-04-09T14:25:55+5:30

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर यांच्या प्रचारार्थ भाजप-शिवसेनेच्या शहर मध्य मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा.

Members of the BJP were elected in Shivapur! | सोलापुरातील शिवसैनिक झाले भाजपचे सदस्य !

सोलापुरातील शिवसैनिक झाले भाजपचे सदस्य !

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे अध्यक्ष इतरांना अनुल्लेखाने मारतात. ही त्यांची आजवरची कामाची पध्दत आहे - तानाजी सावंतकाँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी केवळ नात्या-गोत्यामध्ये उमेदवारी वाटण्याचे काम केले - तानाजी सावंत मनसेचे युवराज चुंबळकर, उमेश रसाळ, नरेश घोरपडे, सागर कदम यांच्यासह काही पदाधिकाºयांनी तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला

सोलापूर : भाजप - सेना युतीचा मेळावा सुरू असताना भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी एका चिठ्ठीवर मोबाईल नंबर लिहून जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्याकडे दिला. कार्यकर्त्यांना हा नंबर डायल करायला सांगा, असा निरोप दिला. त्यानुसार कोठे यांनी भाषण करताना ‘तो’ मोबाईल नंबर शिवसैनिकांना डायल करण्यास सांगितला. त्यानंतर शिवसैनिकांच्या मोबाईलवर ‘भाजप परिवारामध्ये आपले स्वागत आहे. मोदीजींच्या विचारांना स्वीकारल्याबद्दल धन्यवाद’ असा मेसेज आला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर यांच्या प्रचारार्थ भाजप-शिवसेनेच्या शहर मध्य मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिरात झाला, यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत, भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, सभागृह नेते संजय कोळी, अस्मिता गायकवाड, उज्ज्वला येलुरे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात कोठे यांचे भाषण सुरू होते. काँग्रेसवर ते जोरदार टीका करीत होते; पण भाषण सुरू होण्यापूर्वीच वल्याळ यांनी त्यांच्या हातात भाजपच्या सदस्यता नोंदणीसाठीचा मोबाईल नंबर एका चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी कोठे यांना दिली. भाषणात ओघात कोठेंनाही हा नंबर नेमका कशाचा आहे, हे उमजले नाही. त्यांनी अगदी सहजतेने कार्यकर्त्यांना मोबाईल नंबर डायल करण्यास सांगितला. आता जिल्हाप्रमुख आवाहन करताहेत म्हटल्यावर मेळाव्यास जमलेल्या काही शिवसैनिकांनी हा नंबर डायल केला अन् ते भाजपचे सदस्य झाले.

सावंत म्हणाले, पाण्यातून मासा काढल्यानंतर जसा तडफडतो, अशी अवस्था त्यांची झालेली आहे. ही ओढाताण केवळ सत्तेसाठी आहे. शेवटचा अपयशी प्रयत्न ते करीत आहेत. आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांना वाचविण्यासाठी ते धडपडत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष इतरांना अनुल्लेखाने मारतात. ही त्यांची आजवरची कामाची पध्दत आहे. काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी केवळ नात्या-गोत्यामध्ये उमेदवारी वाटण्याचे काम केले.

राष्टÑवादी अध्यक्षांची जीभ घसरू लागली!
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष बुध्दिभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ता नसल्याने त्यांची जीभ घसरु लागली आहे. जयसिध्देश्वरांनी मठातच बसावे असे बोलू लागले आहेत. एवढ्या मोठ्या माणसाला एवढी छोटी भाषा शोभत नाही. मी या शब्दाचा निषेध करतो, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी केली. 

राज ठाकरेंचे कौतुक करत मनसैनिक आले शिवसेनेत 
- मनसेचे युवराज चुंबळकर, उमेश रसाळ, नरेश घोरपडे, सागर कदम यांच्यासह काही पदाधिकाºयांनी तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चुंबळकर यांना शिवसेनेच्या मध्य विभागाचे प्रमुखपद तर रसाळ यांना संघटकपद देण्यात आले. चुंबळकर यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. मनसेमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी आहे. पण त्याचे मतात रुपांतर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Members of the BJP were elected in Shivapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.