सदस्यांना मिळाला श्री विठ्ठल-रुक्मिणीमाता पूजेचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 AM2021-02-24T04:24:32+5:302021-02-24T04:24:32+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहणीनाथ महाराज औसेकर, ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहणीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्या शकुंतला नडगिरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माघ एकादशीनिमित्त विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्याचे आयोजन मंदिर समितीने केले होते. यामुळे वडगाव धायरी (पुणे) येथील श्रीमंत मोरया ग्रुपच्यावतीने उद्योजक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, प्रकाश पोकळे यांनी मंदिरातील फुलांच्या सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. याची दाखल घेत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मोरया ग्रुपला सेवा करण्याची संधी दिली. विठ्ठल व रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची सजावट केली. या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, ग्लॅडिओ, ऑरकेड, ब्लुडीजे, सँगोप ड्रेसिना अशी ५० हजार रुपयांच्या १ टन फुलांचा वापर करण्यात आला. यामुळे मंदिरात प्रसन्न व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
फोटो
२३पंढरपूर
माघ वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.