महाराष्ट्र विधानसभेचे स्मृतिपत्र भालके कुटुंबीयांकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:14+5:302021-03-04T04:40:14+5:30
यावेळी विधानपरिषद आ. प्रशांत परिचारक, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक किरण अवचर, ...
यावेळी विधानपरिषद आ. प्रशांत परिचारक, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक किरण अवचर, नायब तहसीलदार तिटकारे आदी उपस्थित होते.
२८ नोव्हेंबर २०२० रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ. स्व. भारत भालके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी तत्कालीन विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी येथून पुढे विधानसभा सदस्य मयत झाल्यास त्यांना विधानसभेच्या वतीने स्मृतिपत्र देण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाकडून सदरची अंमलबजावणी करून आ. स्व. भारत भालके यांच्या कुटुंबास सदरचे स्मृतिपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सरकोलीचे सरपंच शिवाजी भोसले, उपसरपंच भास्कर भोसले, मंडल अधिकारी संतोष सुरवसे, तलाठी आप्पासोा काळेल, ग्रामसेवक शहाजी शेणवे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.