अंजनडोह येथे सरदार नेमाजीराजे शिंदे यांचे स्मारक उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:43+5:302021-02-09T04:24:43+5:30

करमाळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाेते. अध्यक्षस्थानी मरहट्टी संशोधन मंडळाचे अध्यक्ष सुरेश महानवर हे होते. बंडगर म्हणाले, मराठेशाहीच्या ...

A memorial of Sardar Nemaji Raje Shinde should be erected at Anjandoh | अंजनडोह येथे सरदार नेमाजीराजे शिंदे यांचे स्मारक उभारावे

अंजनडोह येथे सरदार नेमाजीराजे शिंदे यांचे स्मारक उभारावे

googlenewsNext

करमाळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाेते. अध्यक्षस्थानी मरहट्टी संशोधन मंडळाचे अध्यक्ष सुरेश महानवर हे होते.

बंडगर म्हणाले, मराठेशाहीच्या इतिहासात नेमाजीराजे आपल्या पराक्रमाने उत्तर भारतात आक्रमण करून आपले साम्राज्य उभे केले. एवढा मोठा पराक्रमी सरदार करमाळा तालुक्यात होऊन गेला, परंतु इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.

त्यामुळे सरदार नेमाजीराजे यांचा पराक्रम नव्या पिढीच्या समोर आला पाहिजे यासाठी मरहट्टी संशोधन मंडळाचे अध्यक्ष सुरेश महानवर व सहकारी करत आहेत. त्यांना सहकार्य करणे आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी धनगर धर्मपीठ जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळकर, संघटक बाळासाहेब टकले, रासप तालुकाध्यक्ष अंगद देवकते, डाॅ. अशोक शेळके, सुरेश शिंदे, विठ्ठल शिंदे, विक्रम शिंदे, दत्ता शिंदे, प्रतिक शिंदे, चंद्रशेखर पाटील, महेंद्र शिंदे, पाराजी शिंदे, अंकुश शिंदे, प्रदीप हाके, बाळू बंडगर, बापूराव शिंदे, अजिनाथ देवकते, नवनाथ मारकड महाराज, बाळासाहेब भिसे, जालिंदर शिंदे, विनायक मारकड महाराज, आबा शिंदे, नारायण कारंडे उपस्थित होते.

Web Title: A memorial of Sardar Nemaji Raje Shinde should be erected at Anjandoh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.