तत्त्वनिष्ठ आबांचे विधान मंडळात स्मारक उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:09+5:302021-08-18T04:28:09+5:30

सांगोला : महाराष्ट्र विधानसभेतील विधिमंडळाच्या इतिहासातील एक अभ्यासू, जमिनीशी नाळ जोडलेला जनतेचा नेता शेकापचे स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी ...

A memorial should be erected in the Legislative Council of the principled father | तत्त्वनिष्ठ आबांचे विधान मंडळात स्मारक उभारावे

तत्त्वनिष्ठ आबांचे विधान मंडळात स्मारक उभारावे

Next

सांगोला : महाराष्ट्र विधानसभेतील विधिमंडळाच्या इतिहासातील एक अभ्यासू, जमिनीशी नाळ जोडलेला जनतेचा नेता शेकापचे स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळ संस्थेची उंची वाढविण्याचे काम केले. अशा तत्त्वनिष्ठ व्यक्तीचे उचित स्मारक महाराष्ट्र विधान मंडळाने बनवले पाहिजे. त्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सांगितले.

शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगोल्यात येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी रतनबाई देशमुख, पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, डाॅ. बाबासाहेब देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान अवताडे, जयकुमार गोरे, राहुल कुल, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धैर्यशील मोहिते-पाटील, प्रा. नानासो लिगाडे, जि.प. सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, दत्तात्रय टापरे, अभिजित नलवडे, अमोल खरात, दादा जगताप, बंटी लवटे, विलास व्हनमाने, जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी सांगोला शहर व तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

---

पक्षविरहित आबांना मत देण्यास आवडले असते

स्वर्गीय गणपत आबांची मोठी राजकीय परंपरा आहे. या काळात त्यांच्या परिवाराने त्यांना साथ दिली हेही खूप मोठी बाब आहे. अनेक संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिल्याचे सांगताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाने काय भूमिका घ्यायची हा ज्यांचा त्यांचा विषय आहेे; परंतु आबासाहेबासारखी माणसं पक्षविरहित आहेत. कदाचित त्यांना मत देण्यास मला आवडले असते, असे फडवणीस जाता-जाता बोलून गेले.

---

फोटो : १७ सांगोला

माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गणपतराव देशमुख यांच्या कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार आदी.

Web Title: A memorial should be erected in the Legislative Council of the principled father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.