सोलापूरचा पारा ४३.४ अंशांवर
By admin | Published: May 25, 2014 12:52 AM2014-05-25T00:52:27+5:302014-05-25T00:52:27+5:30
हंगामातील सर्वोच्च तापमान
सोलापूर: सोलापूर शहरात उच्चांकी तापमानाची घोडदौड सुरूच आहे. दररोज उगवणारा दिवस उच्चांकी ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या हंगामातील ४३.४ अंश से. तापमानाची नोंद येथील वेधशाळेमध्ये झाली आहे. एप्रिल महिन्यात ४, ५, ६, ७, २४ या तारखांना पारा ४१ अंशांच्या पुढेच राहिला आहे. आज (शनिवारी) त्यात उच्चांकी वाढ होऊन ४३.४ अंशांवर पोहोचला. सोलापुरात यापूर्वी मे १९९३, २००१, २००३ साली ४४.५ अं.से. तापमान नोंदवत हॅट्ट्रिक साधली होती. दशकातले सर्वोच्च तापमान १९ मे २००५ साली ४५.१ उच्चांकी नोंदलेले आहे. आज नोंदलेल्या ४३.४ अं. से. तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता पुन्हा पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.