सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एक कोटीवर मेट्रिक टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:50 AM2019-01-11T11:50:18+5:302019-01-11T11:52:05+5:30

सोलापूर : सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथम असून ३१ साखर कारखान्यांचे बुधवारपर्यंत एक कोटी ६६ हजार ५७९ ...

Metric tonnage on one crore of sugar factories in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एक कोटीवर मेट्रिक टन गाळप

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एक कोटीवर मेट्रिक टन गाळप

Next
ठळक मुद्दे सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथमअहमदनगर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे

सोलापूर : सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथम असून ३१ साखर कारखान्यांचे बुधवारपर्यंत एक कोटी ६६ हजार ५७९ मे.टन गाळप झाले आहे.  ६७ लाख ५८ हजार ३०५ मे.टन गाळप करून अहमदनगर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर तर ६५ लाख ४४ हजार ५७३ मे. टन गाळप करणारा कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप एक नोव्हेंबरपासून सुरू झाले. ऊसदराच्या प्रश्नांमुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने थोड्या उशिराने सुरू झाले; मात्र सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने मागील सव्वादोन महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जिल्ह्यात यावर्षी प्रथमच ३१ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. मागील वर्षी ३० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी गोकुळ माऊली हा साखर कारखाना नव्याने गाळप हंगाम घेत आहे.  बुधवार दिनांक ९ जानेवारीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी एक कोटी ६६ हजार ५७९ मे.टन गाळप तर ९९ लाख २९ हजार १५ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा सरासरी ९.८६ टक्के इतका मिळाला आहे. राज्यात सोलापूर जिल्हा ऊस गाळपात अव्वल ठरला आहे.
शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांचे ६७ लाख ५८ हजार ३०५ मे.टन गाळप तर ७१ लाख ९ हजार ४३५ क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्याचे ऊस गाळप दुसºया क्रमांकाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने वगळता अन्य साखर कारखाने १२ नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी ६५ लाख ४४ हजार ५७३ मे.टन गाळप झाले आहे. ७७ लाख ३८ हजार ६२० क्विंटल साखर तयार झाली असून ११.८२ टक्के उतारा पडला आहे. गाळपात कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसरा आहे. 

 शिंदेने १० लाखांचा टप्पा ओलांडला
च्माढा तालुक्यातील पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना १० लाख १२ हजार २४० मे.टन गाळप करून राज्यात प्रथमस्थानी आहे. कोल्हापूरचा जवाहर कारखाना ६ लाख ७२ हजार ३५० मे.टन. गाळप करून दुसºया,  इंदापूर सहकारी ६ लाख ३८ हजार ९१० मे.टन गाळप करून तिसºया तर बारामती अ‍ॅग्रो ६ लाख २९  हजार ९३५ मे.टन गाळप करून चौथ्या क्रमांकावर आहे. 
आमचा कारखान्याचे यावर्षी २० लाख मे. टन गाळप होईल. कारखाना १५ मार्चपर्यंत सुरू राहील असा अंदाज आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.
-आर.एस.रनवरे, कार्यकारी संचालक,विठ्ठलराव शिंदे कारखाना

Web Title: Metric tonnage on one crore of sugar factories in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.