दुधनी बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:43+5:302020-12-31T04:22:43+5:30

अक्कलकोट-चपळगाव : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापतीपदी मंगळवारी प्रथमेश शंकर म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

Mhetre is the first chairman of the Dudhni Market Committee | दुधनी बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे

दुधनी बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे

googlenewsNext

अक्कलकोट-चपळगाव : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापतीपदी मंगळवारी प्रथमेश शंकर म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रथमेश म्हेत्रे यांनी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने साहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुय्यम निबंधक निवडणूक निर्णय अधिकारी पुष्पक सारडा यांनी बिनविरोध निवड घोषित केली.

यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी सभापती शंकर म्हेत्रे, उपसभापती सिद्धाराम बाके, धरेप्पा डोंगरीतोट, भीमशा आळगी, गीताबाई चौलगी, राजश्री पाटील, अशोक ढंगापुरे, बाबासाहेब पाटील, तळवार, सूर्यकांत वालीकर, महादेव पाटील, सिद्धाराम धल्लू, शांतलिंग परमशेट्टी, सचिव स्वामीनाथ स्वामी उपस्थित होते.

नूतन सभापतीपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, महानिंग परमशेट्टी, शंकर भांजी, बसवराज हौदे, शिवानंद माड्याळ, राजशेखर दोशी, सचिव एम. डी. हौदे, जगदीश माशाळ, गिरमलप्पा सावळगी, अशोक पादी, काशिनाथ गोळ्ळे, नागण्णा दिवटे, मनौद्दिन कोरबू, गुलाब खैराट, गुरू हबशी यांनी कौतुक केले.

---

सर्वात कमी वयाचे सभापती

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर सभापतीची जागा रिक्त झाली होती. त्यांचे नातू प्रथमेश म्हेत्रे यांना या पदावर संधी देण्यात आली, वयाच्या २३ व्या वर्षी सभापतीपद मिळविणारे प्रथमेश म्हेत्रे हे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहेत.

----

फोटो : ३० दुधनी सभापती

दुधनी बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे यांची निवड झाली, याप्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे आणि पदाधिकरी.

Web Title: Mhetre is the first chairman of the Dudhni Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.