हाताला काम मिळविण्यासाठी ऊसतोड मजुरांचे ऊस पट्ट्याकडे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 AM2021-02-24T04:24:06+5:302021-02-24T04:24:06+5:30
माळशिरस तालुक्यात सहकार महर्षी, माळीनगर, श्रीपूर, सदाशिवनगर, चांदापुरी या कारखान्यांबरोबर राजेवाडी, स्वराज्य, गोपुज, पडळ, बारामती ॲग्रो या वेगवेगळ्या कारखान्यांच्या ...
माळशिरस तालुक्यात सहकार महर्षी, माळीनगर, श्रीपूर, सदाशिवनगर, चांदापुरी या कारखान्यांबरोबर राजेवाडी, स्वराज्य, गोपुज, पडळ, बारामती ॲग्रो या वेगवेगळ्या कारखान्यांच्या तोडणी मजुरांच्या टोळ्या तालुक्यातील साखर पट्ट्यात दिसत होत्या. त्यामुळे तालुक्यातील गाळप होत असलेल्या ऊसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत गेले.
सध्या तालुक्यात अत्यल्प क्षेत्रावर ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. यासाठी स्थलांतरित होऊन आलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सध्या शिल्लक असलेल्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शिल्लक ऊस पट्ट्याकडे हे ऊस तोडणी कामगार पुन्हा स्थलांतर करताना दिसत आहे.
स्थलांतराशिवाय पर्याय नाही
गतवर्षातील कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला. यामध्ये ऊस तोडणी कामगारांनाही याची झळ सोसावी लागली. उदरनिर्वाहासाठी शेकडो कुटुंबे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झाली होती. सध्या या पट्ट्यातील ऊसाचे क्षेत्र संपल्यामुळे शिल्लक ऊस पट्ट्याकडे स्थलांतरित होण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसल्याने दररोज शेकडो ऊसतोडणी कामगार आपल्या वाहनांसह ट्रॅक्टरमधून सांगली, कोल्हापूर ऊसपट्ट्याकडे प्रवास करताना दिसत आहेत.
कोट :::::::::::::::::::::::::::
ऊस तोडणीसाठी घेतलेली ॲडव्हान्स रक्कम यावर्षी हंगाम लवकर गुंडाळल्यामुळे परतफेड होऊ शकत नाही. त्यामुळे साहजिकच आणखी काही दिवस ऊसतोडणी होणे आवश्यक आहे. त्यात या भागातील ऊस संपल्यामुळे शिल्लक उसाच्या पट्ट्यात पुन्हा स्थलांतरित व्हावे लागत आहे.
- सखाराम कचरे
ट्रॅक्टर मालक
फोटो :::::::::::::::::::::::::
स्थलांतरित झालेला ऊस तोडणी कामगार दुसऱ्या जिल्ह्याकडे स्थलांतर होतानाचे छायाचित्र.