दुध उत्पादकांनी घातलेल्या दुधाचे पैसे मिळेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:57 AM2018-11-10T10:57:18+5:302018-11-10T10:59:03+5:30

नियमित वेतनात खंड; अनुदान वितरणाचा सुधारित आदेश गुलदस्त्यात

Milk producers donate money for milk! | दुध उत्पादकांनी घातलेल्या दुधाचे पैसे मिळेनात !

दुध उत्पादकांनी घातलेल्या दुधाचे पैसे मिळेनात !

Next
ठळक मुद्देशेतकºयांना हक्काचे पैसे मिळण्यासाठी विलंब होऊ लागलाशासनाकडून गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान प्रक्रिया राबविलीपुणे विभागातील २२ दूध संघांच्या अनुदानाचे ९० कोटी रुपये अद्यापही वितरित झालेले नाही

सोलापूर: पंधरा वर्षे दूध उत्पादकांना नियमितपणे दूध पंढरीकडे पुरवठा केलेल्या दुधाचे पैेसे न चुकता महिन्याच्या ५, १५ आणि २५ तारखेला मिळायचे. आता शासनाकडून गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान प्रक्रिया राबविली जात आहे. याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी शेतकºयांना हक्काचे पैसे मिळण्यासाठी विलंब होऊ लागला आहे. अनुदानासाठीच्या जुन्या आदेशाची मुदत संपली असून, नवा अनुदानाचा आदेश केव्हा निघणार याबद्दलही संभ्रमावस्था आहे.

जुलै २०१८ मध्ये दूध बंद आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आॅगस्टपासून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा आदेश निघाला खरा, परंतु तो तीन महिन्यांसाठीच होता. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत पावडरसाठी जाणाºया दुधालाच अनुदान दिले जाणार आहे, अशी भूमिका असून, नोव्हेंबरमध्ये येणाºया दुधाला अनुदान मिळणार नसल्याचे गृहीत धरून खासगी दूध संघ अनुदान मिळणार नाही, असे आदेश काढू लागले आहेत.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध घालणाºया शेतकºयांच्या खात्यावर दर महिन्याच्या ५, १५ व २५ तारखेला पैसे जमा करण्याचा पायंडा कायम होता. त्यानुसार  दूध उत्पादकांना दर महिन्याच्या ५, १५, २५ तारखेला पैसे मिळणारच, अशी खात्री होती. मात्र याला अनुदानामुळे खंड पडला आहे. शासनाकडून कधी, कसे अनुदान मिळणार व कोणामार्फत देणार हेच नक्की झाले नसल्याने वेतनाचा गोंधळ सुरू आहे. 

पाच तारखेला मिळणारे वेतन २५ व त्यानंतर जमा होऊ लागले आहे. हीच स्थिती राज्यभरातील संघांची असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम महाराष्टÑात २२ संघ अनुदानास पात्र असून, या संघाला दूध अनुदानापोटी एका महिन्याला साधारण ५२ ते ५४ कोटी रुपये द्यावे लागत आहेत. आतापर्यंत आॅगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या १० दिवसांचे ७० कोटी रुपये वितरित केले असल्याचे प्रादेशिक दूग्ध विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

आॅक्टोबरपर्यंतचे पुणे विभागातील २२ दूध संघांच्या अनुदानाचे ९० कोटी रुपये अद्यापही वितरित झालेले नाही. यामुळे खासगी संघांनी तर दोन-दोन महिन्यांचे वेतन शेतकºयांना दिले नसल्याचे सांगण्यात आले. दर कमी मिळत होता त्यावेळी वेतन ठरल्याप्रमाणे होत होते; मात्र अनुदानामुळे दुधाचे पैसेही वेळेवर शेतकºयांना मिळत नाहीत. अनुदानाची रक्कम कायमस्वरूपी मिळणार की नाही?, हेही बेभरवशाचे असल्याने दूध व्यवसाय अडचणीचा ठरू लागला आहे.

‘दूध पंढरी’चे तीन कोटी अडकले
दूध पंढरी (सोलापूर जिल्हा संघ)ने अनुदानापोटी दूध उत्पादकांना ४ कोटी वितरित केले आहेत. त्यापैकी ९० लाख रुपये संघाला मिळाले आहेत. उर्वरित रक्कम अद्यापही शासनाकडून मिळाली नाही; मात्र दूध संघाने शेतकºयांना आॅगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांचे संपूर्ण तर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या १० दिवसांचे पैसे दिले आहेत. 

दोन वर्षांपासून दूध दराच्या चढ-उतारामुळे संघ अडचणीत आहे. अशातच अनुदानाची रक्कम वेळेत मिळत नाही. शासन आदेशाप्रमाणे शेतकºयांची बँक खातीही कळवली आहेत. त्यामुळे संघाची आर्थिक अडचण होत आहे.
- आ. प्रशांत परिचारक, चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ

Web Title: Milk producers donate money for milk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.