जुळे सोलापूरात दुषित पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 03:05 PM2018-03-31T15:05:57+5:302018-03-31T15:05:57+5:30
सोलापूर शहरातील जुळे सोलापूरात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला़
सोलापूर : सोलापूर शहरातील जुळे सोलापूरात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला़ नेहमी स्वच्छ स्वरूपात येणारे पाणी शनिवारी लालसर म्हणजेच दुषित स्वरूपात आले़
उजनीतून भीमेत सोडलेले पाणी औज बंधाºयात येण्यास विलंब झाल्याने गुरूवारपासून शहराला एक आठवडा शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
औज बंधारा रिकामा करून चिंचपूर बंधाºयात पाणी घेतल्यानंतर मनपा प्रशासनाने २५ मार्चला उजनीतून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याला पत्र दिले. पण पाटबंधारे खात्याने चैत्री वारीचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवत उशिराने उजनीतून पाणी सोडले. पहिल्यांदा १५ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर १३५00 क्युसेक्स आणि पंढरपूरला पाणी पोहोचल्यावर ९000 क्युसेक्स फ्लो करण्यात आला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पुळूज बंधाºयात पाणी आल्यावर पाण्याचा फ्लो ८000 करण्यात आला आहे. उन्हाचा कडाका व नदीचे पात्र कोरडे असल्याने दररोज २0 किलोमीटर याप्रमाणे भीमेतून पाणी पुढे सरकत आहे. औज बंधाºयात पाणी येण्यासाठी आणखी ८४ किलोमीटरचा प्रवास आहे. याचा विचार केल्यास २ एप्रिलला औज बंधाºयात पाणी पोहोचेल असा अंदाज आहे.
ऐनवेळी बदल झाल्यामुळे पाणी येणार या भरवशावर असणाºयांना मोठा फटका बसणार आहे. औज व चिंचपूर बंधारा भरल्यानंतर पाण्याचे नियोजन तीन दिवसांवर आणण्यात येणार आहे. एक दिवसाची पाळी पुढे गेल्याने किमान दोन आठवडे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.