मालट्रकच्या धडकेत दूधवाला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:08+5:302021-03-20T04:21:08+5:30

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रामहिंगणी येथील शिवाजी बाबू बंडगर यांचा दूध संकलन व विक्रीचा व्यवसाय आहे. ते दररोज दुचाकीवरून ...

The milkman was killed on the spot in a truck accident | मालट्रकच्या धडकेत दूधवाला जागीच ठार

मालट्रकच्या धडकेत दूधवाला जागीच ठार

Next

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रामहिंगणी येथील शिवाजी बाबू बंडगर यांचा दूध संकलन व विक्रीचा व्यवसाय आहे. ते दररोज दुचाकीवरून दूध विक्री करतात. शुक्रवार, १९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता मोहोळ शहरातील हॉटेल लोकसेवालगत असणाऱ्या सोलापूर-पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडने ते दुचाकीवरून (एम.एच. १३ सी.एक्स. २२४९) सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने (क्र. एच.आर. ५५. ६७३२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने शिवाजी बंडगर यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत शिवाजी बंडगर यांचा पुतण्या अप्पासाहेब मल्‍हारी बंडगर यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदला असून, तपास सहायक फौजदार अशोक गायकवाड करीत आहेत.

---

ट्रकचालकाने ठोकली धूम

अपघातानंतर ट्रक जागेवरच सोडून चालकाने धूम ठोकली. या अपघातामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

-----

Web Title: The milkman was killed on the spot in a truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.