उजनी धरणातील लाखो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:22 AM2021-05-19T04:22:21+5:302021-05-19T04:22:21+5:30

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गेली महिनाभर पाण्याच्या वादाने चर्चेत असतानाच आता दूषित पाण्याचा फटका उजनी धरणातील माशांना ...

Millions of fish die in Ujani dam | उजनी धरणातील लाखो मासे मृत्युमुखी

उजनी धरणातील लाखो मासे मृत्युमुखी

googlenewsNext

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गेली महिनाभर पाण्याच्या वादाने चर्चेत असतानाच आता दूषित पाण्याचा फटका उजनी धरणातील माशांना बसला आहे. पावसाळ्यात पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरामधून व एमआयडीसीतून सोडलेले केमिकल्स उजनी धरणाच्या तळाशी साठलेले असते; परंतु अशा प्रकारे मोठे वारे अथवा धरणातील पाणीसाठा मृत झाला की हा केमिकल्सचा गाळ वरती येतो, हे पाणी हिरवट होते. त्यामुळे धरणातील अनेक सजीव मृत्यू पावतात. त्यामुळे उजनीतील अनेक दुर्मिळ जातीचे लाखो मासे मरून खच पडला आहे. या पाण्याचा अत्यंत घाण वास मारत असून यामुळे उजनीतील अनेक प्रकारच्या माशांचा जसे की दुर्मिळ मासे, औषधी गुणधर्म असणारे आहेर जातीचा मासा, कटला, मरळ, शिंगाडा, वांब,खद्री, डोकडा या जातीचे मासे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उजनी जलाशयाच्या किनारी तर माशांचा खच पडला असून यामुळे परिसरात पाण्याची दुर्गंधी व मेलेल्या माशांची दुर्गंधी पसरली आहे या दूषित पाण्याचा पिकांना सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे उजनीच्या काठावरील शेतकरी वर्गाने धसका घेतला आहे.

-----

कोट

अशाप्रकारे उजनीतील मासे प्रदूषित पाण्याने मेले तर मत्स्य व्यवसाय संपुष्टात येईलच व यावर अवलंबून असणारे अनेक संसार उद्ध्वस्त होतील; प्रशासनाने पाणी शुद्ध करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात व मत्स्यबीज धरणात प्रत्येक वर्षी सोडावेत.

- संजय पाटील, माजी कृषी व पशुसंवर्धन

कोट

पुणे, पिंपरी चिंचवड, इंदापूर, शिरूर, बारामती, दौंड, लोणावळा, हवेली सांडपाणी नदीत येते, त्याचबरोबर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील १९४ गावे व शेती यासाठी कसलीही प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्यामुळे हे पाणी उजनीत येते, पुण्यामध्ये अनेक कंपन्या छोट्या-मोठ्या तलावांमधून हे केमिकल पाणी साठवून ठेवतात व पावसाळ्यात सोडून देतात यामुळे उजनीतील पाणी गेली दहा ते बारा वर्ष दूषित झालेले पाहायला मिळते.

- अनिल पाटील, जलतज्ज्ञ, वरवडे, ता.माढा

----

फोटो : १८ भीमनगर

Web Title: Millions of fish die in Ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.