एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कचरा! 

By Appasaheb.patil | Published: October 1, 2023 03:01 PM2023-10-01T15:01:57+5:302023-10-01T15:02:02+5:30

या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केले होते

Millions of hands strove for cleanliness for an hour; Garbage picked up by district officials of Solapur! | एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कचरा! 

एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कचरा! 

googlenewsNext

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर :  स्वच्छता ही सेवा मोहीम आद तालुक्यातील सर्व गावांमध्ये “एक तारीख एक तास” या मोहिमेखाली स्वच्छतेसाठी लाखो हात झटले.  हजारो टन कचरा गोळा करण्याबरोबर आबाल वृध्द, अपंग या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान, रविवारी जिल्हा परिषद व मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला तर हातात हॅन्डग्लोज घालून कचरा उचलला. 

या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केले होते. या आवाहनास जिल्हयात भरभरून प्रतिसाद मिळाला. जिल्हात रविवारी सोलापूर शहराबरोबरच  ११ तालुक्यातील १०१९ ग्रामपंचायतीमधील ११४१ गावात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. एक तास स्वच्छतेसाठी म्हणून आलेल्या ग्रामस्थांनी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दोन तासा पेक्षा अधिक काम सुरू ठेवले. अनेक ठिकाणी पडत्या पावसात श्रमदान केले. सर्व गटविकास अधिकारी यांनी गेल्या तीन दिवसांपासून चांगले नियोजन केले होते. त्यामुळे स्वच्छता श्रमदानाचा मेसेज सर्व लोकांपर्यंत जाण्यास मदत झाली.

Web Title: Millions of hands strove for cleanliness for an hour; Garbage picked up by district officials of Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.