अपघातातील जखमींना मदत करणाºयांना मिळणार लाखोंची बक्षीसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:47 PM2018-05-29T12:47:06+5:302018-05-29T12:47:06+5:30
वाहन, रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाºया व्यक्ती, संस्था, समुहाना आता राज्य शासनाच्यावतीने बक्षीस देण्यात येणार आहे़
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वाहन, रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाºया व्यक्ती, संस्था, समुहाना आता राज्य शासनाच्यावतीने बक्षीस देण्यात येणार आहे़ याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने २५ फेबु्रवारी रोजी जाहीर केला़
गृहमंत्री यांच्याकडील रेसकोर्स निधीतून वाहन/रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाºया जखमींचे प्राण वाचविण्याकरिता त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जाणाºया व्यक्ती, संस्था, संस्था, समुह यांना प्रथम १ लाख ५० हजार रूपयांचे परितोषिक, व्दितीय बक्षीस १ लाख रूपयाचे परितोषिक तर तृतीय ५० हजार रूपये परितोषिक राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे़
पोलीस अधिक्षक, महामार्ग पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे प्रमुख हे अपघातग्रस्तांना संबंधित व्यक्ती, संस्था, समुह यांनी केलेल्या मदतीसंदर्भात त्यांना बक्षीस देण्याबाबतचा प्रस्ताव अपघात घडल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करतील त्यानंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत शासन स्तरावर जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या प्रस्तातांवर त्या पुढील वर्षीच्या मार्चअखेरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे़