लाखो रुपयांच्या विटांची झाली माती; ओल्या विटांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:16 AM2021-06-06T04:16:46+5:302021-06-06T04:16:46+5:30
मंगळवेढा येथील विटांची भाजणी चांगली असल्याने सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, कर्नाटक राज्यातही मोठी मागणी आहे. यावर्षी वर्षभर दर महिन्याला ...
मंगळवेढा येथील विटांची भाजणी चांगली असल्याने सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, कर्नाटक राज्यातही मोठी मागणी आहे. यावर्षी वर्षभर दर महिन्याला दोन-तीन वेळेस अवकाळी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे तयार कच्च्या विटांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वीटभट्टी हंगामाचा शेवट सुरू
मागील पंधरवड्यात व आता चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विटा भिजून नुकसान होत आहे. पाऊस व वारा कधीही येत असल्याने अनेक वीट उत्पादकांनी बनविलेल्या कच्च्या विटा ताडपत्रीने झाकून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या वीटभट्टी हंगामाचा शेवट सुरू आहे. शेवटचा माल हा भट्टी मालकांचा नफा असतो. मात्र, हा मालच भिजून चालल्याने तोटा सहन करावा लागणार आहे.
कोट :::::::::::::::::::
मान्सूनपूर्व पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज उत्पादकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने राॅयल्टीमध्ये सवलत देण्याबरोबर आर्थिक मदत द्यावी.
- भैया मकानदार
वीट उत्पादक, मंगळवेढा
फोटो ओळी :::::::::::::::
मंगळवेढा येथे अवकाळी पावसाने वीटभट्टीवर विटांचे झालेले नुकसान.