‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी
By राकेश कदम | Updated: April 18, 2024 20:18 IST2024-04-18T20:18:17+5:302024-04-18T20:18:35+5:30
: ना उमेदवार देणार, ना प्रचार करणार

‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी
राकेश कदम/ साेलापूर : एमआयएम साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देणार नाही. कुणाचा प्रचार अथवा पाठिंबाही देणार नाही, असे पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले.
शाब्दी म्हणाले, आम्ही साेलापुरातून उमेदवार देण्याची तयारी केली हाेती. दहा जणांची यादी आमच्याकडे तयार हाेती. माजी आमदा रमेश कदम यांच्यासाेबतही बाेलणी झाली. पण ही बाेलणी पुढे गेली नाहीत. दरम्यानच्या काळात काही आम्ही समाजातील ज्येष्ठांशी संवाद साधला. सध्या देशाचे संविधान वाचविण्याची लढाई सुरू आहे. या लढाईत एमआयएमने वेगळा निर्णय घेउ नये, असा सूर निघाला. त्यामुळे आम्ही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही जाहीरपणे कुणालाही पाठिंबा देणार नाही. विधानसभा निवडणुकीत जे हाेईल. आम्ही अटी शर्ती घालण्याचा विषयच नाही, असेही ते म्हणाले.
ते इंडिया आघाडीचे दुर्देव
साेलापुरात आम्ही कुणाशी आघाडी केलेली नाही. देशातील इंडिया आघाडीने आम्हाला साेबत घेतले नाही. हे त्यांचे दुर्देव आहे, असेही शाब्दी म्हणाले.