जीवनात शांतीसाठी मनावर ताबा गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 03:16 PM2020-10-22T15:16:36+5:302020-10-22T15:17:02+5:30

मन संतुष्ट झाल्यावरच समाधान शक्य आहे. 

Mind control is needed for peace in life | जीवनात शांतीसाठी मनावर ताबा गरजेचा

जीवनात शांतीसाठी मनावर ताबा गरजेचा

Next

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात समाधान पाहीजे पण यासाठी तो काहीच करत नाही. जीवनात शांतीसाठी मनावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुमच्या मनात काम, क्रोध, लोभ अशा भावना आहेत, तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही. मन संतुष्ट झाल्यावरच समाधान शक्य आहे. 

एका गावात एक विद्वान संत राहत होते. लोक त्यांच्याकडे आपल्या अडचणी घेऊन जायचे त्यांना संताकडून समाधान मिळायचे. एक दिवस एक शेठजी त्या संताकडे आले आणि म्हणाले माज्याकडे सर्व गोष्टी आहेत कशाची काही कमी नाही तरीपण माझे मन शांत नाही. मला समाधान मिळत नाही सांगा मी काय करू ..?
 
हे ऐकून संत जागेवरून उठले आणि आश्रमाकडे निघाले. शेठजीही त्यांच्या मागे मागे आले. आश्रमाच्या एका मोकळ्या कोप?्यात त्यांनी आग पेटवली आणि त्या आगीत ते हळु हळू एक एक काडी टाकत होते. टाकलेल्या प्रत्येक काडीसोबत आग कमी जास्त होत होती. काही वेळाने संत परत आपल्या जागेवर येऊन बसले. खुप वेळ झाला तरी संत काहीच बोलले नाही म्हणून शेठजीने विचारले, गुरूजी मी आपल्या उत्तराची वाट पाहतोय. त्यावर संत हसुन म्हणाले एवढा वेळ मी तुज्याच प्रश्नाचे उत्तर देत होतो पण अस वाटत की तुला ते कळलं नाही,मी तुला समजावुन सांगतो.

संत म्हणाले प्रत्येक माणसात एक आग असते. जर तुम्ही त्यात काम,क्रोध,लोभ,मोह आणि मधाच्या काड्या टाकल्या तर जीवनात कधीच समाधान मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही या तत्वांना आगीत टाकायचे बंद करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. संताचे बोलने ऐकुन शेठजी आपल्या समस्येचे समाधान मिळाले.
- ह.भ.प. माऊली काशीद,
सोलापूर

Web Title: Mind control is needed for peace in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.