मंत्र्यांनी घोषणा केली अन् दोन तासात दोन कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:03+5:302021-05-08T04:23:03+5:30
७ मे रोजी बीआयटी अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी बार्शीसह भूम, परांडा, वाशी, उस्मानाबाद, तुळजापूर, माढा, करमाळा, मोहोळ येथील बाधित ...
७ मे रोजी बीआयटी अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी बार्शीसह भूम, परांडा, वाशी, उस्मानाबाद, तुळजापूर, माढा, करमाळा, मोहोळ येथील बाधित रुग्णांसाठी १००० बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले. याच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आले होते.
त्यावेळी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी व मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांच्यामार्फत बार्शी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प, बायपॅक खरेदीसाठी दोन कोटी निधीची मागणी केली होती. या मागणीप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ नगरपरिषदेस दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. याचा आदेशही राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांच्या सहीने हा प्राप्त झाला आहे.