'केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी,' संशोधक तरुणांच्या पाठीवर गडकरींची थाप

By शीतलकुमार कांबळे | Published: March 21, 2023 01:08 PM2023-03-21T13:08:52+5:302023-03-21T13:11:03+5:30

केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान, विशाल बगलेंचे संशोधन

minister nitin Gadkari s pat on the back of young researchers If chemicals are added even closed bores will get water | 'केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी,' संशोधक तरुणांच्या पाठीवर गडकरींची थाप

'केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी,' संशोधक तरुणांच्या पाठीवर गडकरींची थाप

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : शेती व उद्योगांसाठी लागणारे बोअर काही कारणाने बंद पडतात. यात केमीकल टाकले की बंद असलेले बोअर सुरु होतात. हे संशोधन केलेल्या सोलापूरच्या विशाल बगले या तरुणाने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत माहिती दिली. गडकरी यांनी संशोधनाचे कौतुक केले.

शेतकऱ्यांची शेती तसेच गावातील गावकरी पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. अनेकदा कोरडे बोअरवेल आणि कमी पाणी असणारे बोअरवेल हे नेहमी एक मोठी अडचण ठरतात. हे ओळखून सोलापूर येथे राहणारे खनिज अभियंता विशाल बगले यांनी कोरडे बोअरवेल आणि चालू बोअरवेलला पाणी वाढविण्यासाठीचे सोपे व स्वस्त खर्चिक केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केले.

गडकरी यांनी या तंत्रज्ञान बद्दलची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य सरकार यांना पत्र लिहून प्रकल्प राबविण्यासाठी सुचविले.

असे वाढते पाणी
अनेक शेतकऱ्यांची शेती ही बोअरच्या पाण्यावर अवलंबून असते. काही कारणाने बोअरला पाणी येत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही बोअरमध्ये केमिकल टाकतो. ज्यामुळे त्याचे झरे मोकळे होऊन पाणी बोअरपर्यंत येऊन थांबते. या संशोधनामुळे शेतकऱ्यांसोबतच जी गावे बोअरच्या पाण्यावर अवलंबून असतात त्यांनाही फायदा होणार आहे.

Web Title: minister nitin Gadkari s pat on the back of young researchers If chemicals are added even closed bores will get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.