आरोग्य कर्मचार्‍यांच्या ७ दुरुस्ती मागण्या मान्य ग्रामविकास मंत्री: मुंबईत बैठक

By admin | Published: May 6, 2014 07:02 PM2014-05-06T19:02:34+5:302014-05-07T00:10:43+5:30

सोलापूर: जि. प. आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदलीबाबतच्या सात दुरुस्ती मागण्या तत्त्वत: मान्य झाल्या असून, याबाबतचा आदेश २० मेपर्यंत निघण्याची शक्यता आहे.

Minister for Social Development: Honorable Minister for Rural Development: Meeting in Mumbai | आरोग्य कर्मचार्‍यांच्या ७ दुरुस्ती मागण्या मान्य ग्रामविकास मंत्री: मुंबईत बैठक

आरोग्य कर्मचार्‍यांच्या ७ दुरुस्ती मागण्या मान्य ग्रामविकास मंत्री: मुंबईत बैठक

Next

सोलापूर: जि. प. आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदलीबाबतच्या सात दुरुस्ती मागण्या तत्त्वत: मान्य झाल्या असून, याबाबतचा आदेश २० मेपर्यंत निघण्याची शक्यता आहे.
रविवारी (दि. ४) ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सचिव एस. एस. संधू, उपसचिव रहाटे, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश जाधव, मुख्य सचिव शिवाजी गवई, कोषाध्यक्ष पी. जी. वैष्णव, राजेंद्र माशाळ, श्रीमती कमठाणे, शिवाजी घुगे, शरद बडे, मोहन गायकवाड, प्रशांत पाटील, सतीश कांबळे, शेखर शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. बैठकीत तालुक्यांतर्गत प्रशासकीय व विनंती बदलीसाठी सेवक/सेविकेची आस्थापना यापुढे उपकेंद्रच ठेवावी, प्रशासकीय बदली झालेल्यांना तालुक्यात वापसी-आपसी बदली रिक्त जागेनुसार मिळावी, तालुक्याबाहेर प्रशासकीय बदली होऊ नये, प्रशासकीय बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण हा मुद्दा प्राधान्याने समाविष्ट करावा, पर्यवेक्षक यांच्या बदलीची टक्केवारी जिल्हास्तरावर वापरण्यात यावी, तालुक्यांतर्गत बदल्यासाठी सहायक/सहायिका या संवर्गासाठी २० टक्के मिळाव्यात, या मागण्या तत्त्वत: मान्य करण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्हा बदली, जिल्‘ांतर्गत, तालुक्यांतर्गत विनंती बदलीसाठी पात्रतेचा निकष ५ वर्षांवरून एक वर्ष करण्याविषयी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री आणि सचिवांनी दिले.
शिवाय गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचार्‍यांचा पगार झाला नाही, याविषयी सचिव एस. एस. संधू यांनी तीन दिवसांत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संघटनेला दिल्याचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

Web Title: Minister for Social Development: Honorable Minister for Rural Development: Meeting in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.