पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

By Appasaheb.patil | Published: March 3, 2023 07:18 PM2023-03-03T19:18:25+5:302023-03-03T19:18:46+5:30

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी मंत्री सुधीर मुनगंटीवार केली. 

 Minister Sudhir Mungantiwar inspected the Namsankirtan Hall in Pandharpur  | पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

googlenewsNext

सोलापूर : पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना अनेक सोयी-सुविधांबरोबरच भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत, यासाठी राज्य शासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून नामसंकीर्तन सभागृहाचे काम सुरू आहे. या नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाची पाहणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी तथा नगरपालिका प्रशासक गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्यधिकारी अरविंद माळी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले, प्रतिवर्षी लाखो भाविक मोठ्या भक्तीभावाने विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीची वारी करतात. अधिकाधिक सोयी सुविधा देऊन भाविकांना विठू माऊलीचे दर्शन सुकर व्हावे यासाठी शासन व स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असते असेही त्यांनी सांगितले.

निधी कमी पडू देणार नसल्याचे दिले आश्वासन...
भाविक व कला रसिकांच्या सोयीसाठी असाच एक प्रकल्प नामसंकीर्तन सभागृहाच्या माध्यमातून पंढरपूर येथे साकारत आहे. या नामसंकीर्तन सभागृहाचे काम काही प्रमाणात निधीअभावी अपूर्ण असून, या सभागृहास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. या माध्यमातून पंढरपुरात भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

 

Web Title:  Minister Sudhir Mungantiwar inspected the Namsankirtan Hall in Pandharpur 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.