सोलापूरच्या डॉक्टरचा ‘कोरोना’विरोधी संशोधनाचा प्रस्ताव मंत्रालयाने स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:40 PM2020-05-15T12:40:26+5:302020-05-15T12:42:34+5:30

आयुष मंत्रालयाने घालून दिले जाचक नियम; राघवेंद्र नादरगी यांच्या संशोधनाआड आल्या अनेक अडचणी

The ministry accepted the anti-corona research proposal of a doctor from Solapur | सोलापूरच्या डॉक्टरचा ‘कोरोना’विरोधी संशोधनाचा प्रस्ताव मंत्रालयाने स्वीकारला

सोलापूरच्या डॉक्टरचा ‘कोरोना’विरोधी संशोधनाचा प्रस्ताव मंत्रालयाने स्वीकारला

Next
ठळक मुद्देरोगप्रतिकारक ाक्ती वाढविण्याच्या दृष्टीने आयुर्वेदात सांगितलेल्या विविध औषधांचा काढाऔषधांचा काढा रुग्णांना नियमितपणे दिले गेल्याने रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीत वाढआयुर्वेदिक प्रयोग केरळ, मध्यप्रदेश, हरयाणा तसेच गोव्यामध्ये करण्यात आला

सोलापूर : सोलापुरातील आयुर्वेदिक डॉ. राघवेंद्र नादरगी यांनी कोरोनाविरोधात संशोधनपर एक प्रस्ताव विश्लेषणासह केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला पाठवला. प्रस्तावाची दखल आयुष मंत्रालयाने घेतली असून, संशोधनाला पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध नियमावली आयुष मंत्रालयाने घालून दिली. नियमावली जाचक असून, संशोधनास अडथळा निर्माण होत आहेत, अशी खंत डॉ. राघवेंद्र नादरगी यांनी व्यक्त केली आहे.

  केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोनाविरोधात आयुर्वेदिक संशोधन करण्याचे आवाहन देशभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आयुष मंत्रालयाच्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभरातील एक हजार आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोनाविरोधात संशोधन प्रस्ताव पाठवला. यात सोलापूरच्या डॉ. नादरगी यांच्या प्रस्तावाचा समावेश आहे. कोरोनाविरोधात जगभरातील डॉक्टर मंडळी संशोधनात व्यस्त आहेत. भारतातील आयुर्वेदिक शास्त्रात अशा काही दुर्मिळ आजारांवर विविध उपाय आहेत. याच अनुषंगाने गुजरातमध्ये एक सकारात्मक घटना अलीकडच्या काळात बघायला मिळाली. कोरोनासंबंधित संशयित रुग्ण असलेल्या काही हजार रुग्णांना होम क्वारंटाईन तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. अशा काही हजार रुग्णांवर आयुर्वेदिक काढा नियमितपणे देण्यात आला.

रोगप्रतिकारक ाक्ती वाढविण्याच्या दृष्टीने आयुर्वेदात सांगितलेल्या विविध औषधांचा काढा रुग्णांना नियमितपणे दिले गेल्याने रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीत वाढ होत राहिली. त्यामुळे ९९.९९ टक्के रुग्ण हे कोरोनामुक्त आढळून आले. असाच आयुर्वेदिक प्रयोग केरळ, मध्यप्रदेश, हरयाणा तसेच गोव्यामध्ये करण्यात आला. या उपचार पद्धतीचे सर्वत्र स्वागत होत आहे. गेल्या काही वर्षांपासून मी आयुर्वेदिक उपचार करत आहे, त्यामुळे ही आयुर्वेदिक उपचार पद्धती स्वस्त आणि गुणकारक आहे. याचे साईड इफेक्ट नाहीत. आयुष मंत्रालयाने स्वास्थ्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार विविध नियमावली संशोधन पद्धतीवर घातल्याने संशोधनास अडथळा निर्माण होत आहे. नियमावलीत स्वायत्तता हवी. व्यक्तिगत संशोधनास मान्यता नाही, त्यामुळे संस्थात्मक संशोधन करण्यास काही अडचणी येतात. 

या गोष्टी करून पाहा...

  • - रोजच्या स्वयंपाकात हळद, जिरे आणि लसूण यांचा वापर करा.
  • - रोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा च्यवनप्राश खा.
  • - दिवसातून एकदा वनौषधीयुक्त ग्रीन टी प्यावे.
  • - ‘आयुष काढा’ बनवून प्यावे. (तुळस + दालचिनी + सुंठ + काळी मिरी + मनुका) यांचा एकत्र आयुष काढा करून प्यावा, गरज लागल्यास चवीसाठी गूळ किंवा लिंबू रसाचा वापर करा
  • -  सकाळी साध्या चहाऐवजी गरम दुधात हळद टाकून प्या. दररोज सकाळी व सायंकाळी दोन्ही नाकपुड्यास तीळतेल किंवा खोबरेल तेल किंवा गाईचे तूप लावावे.
  • -  दिवसातून दोन वेळा गरम पाण्यात हळद टाकून गुळण्या करा.
  • - घसा दुखत असेल किंवा कोरडा खोकला असेल तर दिवसातून एकदा ताज्या पुदिन्याची पाने किंवा ओवा घातलेल्या गरम पाण्याचा वाफ घ्यावा. या सर्व उपाययोजना आयुष मंत्रालयास मान्य आहेत, रोगप्रतिकारशक्ती वाढीस खूप उपायकारक आहेत. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कराव्यात, असेही डॉ. राघवेंद्र नादरगी सांगतात.

Web Title: The ministry accepted the anti-corona research proposal of a doctor from Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.