हुन्नूर येथे शाळेला जाणाºया अल्पवयीन मुलीला पळविले; एका विरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:46 PM2019-01-28T12:46:23+5:302019-01-28T12:48:37+5:30
मंगळवेढा : शाळेला जात असताना एका १३ वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेल्याची घटना हुन्नूर (ता.मंगळवेढा) येथे ...
मंगळवेढा : शाळेला जात असताना एका १३ वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेल्याची घटना हुन्नूर (ता.मंगळवेढा) येथे घडली. याप्रकरणी म्हाळाप्पा नागनाथ हेगडे (वय २०) याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
हुन्नूर येथील अल्पवयीन मुलगी दिनांक २५ रोजी माध्यमिक आश्रम शाळेत जात असताना सकाळी ९.३० च्या सुमारास आरोपी म्हाळाप्पा हेगडे याने अज्ञात कारणावरून तीला फुस लावून एम.एच.१३-२३२२ या मोटरसायकलवरून पळवून नेल्याचे दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर म्हाळाप्पा हेगडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.