नात्याला काळीमा! सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:48 PM2023-02-14T16:48:52+5:302023-02-14T16:50:04+5:30
विलास जळकोटकर सोलापूर - नात्यातल्या एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केले. हा प्रकार २ ते ३ ...
विलास जळकोटकर
सोलापूर - नात्यातल्या एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केले. हा प्रकार २ ते ३ ऑगस्ट २०२२ या दरम्यान विजापूर जिल्ह्यातील एका घडला. दरम्यान पीडितेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधीत आरोपीवर झिरो नंबरने गुन्हा नोंदवून तो कर्नाटकातील बागेवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार यातील पीडित फिर्यादी ही आई, वडील आणि दोन भाऊ असे जिल्ह्यातील एका गावात राहतात. तिच्या आईचे माहेर विजापूर जिल्ह्यातील एका गावात असल्याने पीडिता व तिचा भाऊ पंचमीला आजोळी गेले होते. येथे नात्यातल्या तरुणाने पिडितेवर रात्रीच्यावेळी अत्याचार केला. पीडितेने घाबरुन कोणालाच काही सांगितले नाही. दोन दिवसानंतर परत आपल्या गावी आली.
गावी आल्यानंतर काही दिवसांनी मासिक पाळी आली नाही. मात्र दर महिन्याला वेळेवर ती येत नसल्याने तसेच काही महिने गेले. शेवटी पीडितेच्या आईने तिला तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले. तेथे तपासणी केली असता ती साडेपाच महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांना खबर दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनपुडे-पाटील व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट पिडितेचा जबाब नोंदवून घेतला. यात तिने घडला प्रकार कथन केला. सदरची घटना घडल्याचे विजापूर जिल्ह्यातील एका गावात घडल्याने सदर गुन्हा बागेवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. अल्पवयीन मुलगी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.