मीर इसहाक शेख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:04+5:302021-06-29T04:16:04+5:30
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मीर इसहाक शेख यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. मागील महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग ...
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मीर इसहाक शेख यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. मागील महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झालेल्या प्रा. शेख यांना पोस्ट कोविडच्या समस्यांनी ग्रासले होते. ते मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे एक संस्थापक होते. त्यांनी स्वातंत्र्य मागणारी उर्दू कविता, लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतीचित्रे, मराठी स्वातंत्र्य गीतांवरील एक पुस्तक लिहिले आहे. अलिकडे त्यांनी जागतिक पातळीवर गाजलेल्या ‘अर्ररहीकुल मख्तूम’ या प्रेषित चरित्राचे मराठी भाषांतर केले होते. त्यांचे हजरत बिलाल यांच्यावरील एक भाषांतरित पुस्तक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरकडून प्रकाशित केले जात आहे. शिवाय त्यांनी मौलाना शिबली नोमानी लिखित ‘अल् फारुख चे मराठी भाषांतर जवळपास पूर्ण केले होते. प्रा. शेख हे निर्मलकुमार फडकुले संकुलाचे ट्रस्टी होते. त्याशिवाय मनपा शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले जावई सूना नातवंडे असा परिवार आहे.