नवोपक्रम स्पर्धेत मिरजगीची शिक्षिका राज्यात तिसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:29+5:302021-03-07T04:20:29+5:30

या स्पर्धा पाच गटात घेण्यात आले होते. त्यातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या दुसऱ्या गटासाठी असे एकूण ७२० प्रस्ताव ...

Mirajgi's teacher is third in the state in the innovation competition | नवोपक्रम स्पर्धेत मिरजगीची शिक्षिका राज्यात तिसरी

नवोपक्रम स्पर्धेत मिरजगीची शिक्षिका राज्यात तिसरी

Next

या स्पर्धा पाच गटात घेण्यात आले होते. त्यातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या दुसऱ्या गटासाठी असे एकूण ७२० प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील जिल्हा व विभागीय स्तरावरील मूल्यांकनात एकूण १४० नवोपक्रम राज्यासाठी पात्र ठरले. अशा सर्व फेऱ्यात यश मिळवत करुणा गुरव यांचा कोव्हिड हायटेक या नवोपक्रम राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.

या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे ऑनलाइन बक्षीस वितरण ५ मार्च २०२१ रोजी झाले. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड, सहसंचालक डॉ. विलास पाटील यांनी उपस्थित राहून सर्व स्पर्धकांचे कौतुक केले.

प्रास्ताविक डॉ. गीतांजली बोरुडे यांनी केले तर आभार अमोल शिनगारे यांनी मानले.

करुणा गुरव यांनी कोव्हिड हायटेक हा नवोपक्रम राज्यातील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना उपयुक्त व मार्गदर्शक ठरला आहे.

फोटो

०६ करुणा गुरव-शिक्षिका

Web Title: Mirajgi's teacher is third in the state in the innovation competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.