एम.आय.टी. रेल्वे इंजिनियरिंग कॉलेजची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:47+5:302021-09-19T04:23:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : एम.आय.टी. संस्था ही मूल्यवर्धित शिक्षणासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देशामध्ये ओळखली जाते. गेल्या दीड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : एम.आय.टी. संस्था ही मूल्यवर्धित शिक्षणासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देशामध्ये ओळखली जाते. गेल्या दीड वर्षात जगात कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था होरपळून निघाल्या आहेत. अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसायांवर याचा परिणाम झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रावरही बदलाचा परिणाम झाला आहे. या आर्थिक मंदीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले आहे.
सामाजिक कर्तव्याची भान ठेवत एम.आय.टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंग अँड रिसर्च, बार्शी संस्थेने यावर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिल्याची घोषणा प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी दिली. कोरोना दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यालाही पूर्ण शैक्षणिक शुल्क माफी मिळू शकते.
कोरोनात दोन्हीपैकी एक पालक गमावलेला विद्यार्थी किंवा जामगावाचा, बार्शी शहराचा कायम रहिवासी अथवा बार्शी तालुक्याचा कायम रहिवासी व ज्याने बार्शी शहरातून बारावी पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांना दहा हजारांची शिष्यवृत्ती देणार आहे. सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये (एमएचटी-सीईटी) १०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या प्रवेशित विद्यार्थ्याला १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल. ९१ ते १०० गुण असलेल्या विद्यार्थ्याला रुपये दहा हजार, ८१ ते ९० गुण असलेल्या विद्यार्थ्याला रुपये सात हजार आणि ७१ ते ८० गुण प्राप्त असलेल्या विद्यार्थ्याला रुपये पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहे. ' शिका आणि कमवा' योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृह निवास पूर्णपणे मोफत देणार आहेत. याप्रसंगी डॉ. लेंगरे यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाचे तसेच प्रा. स्वाती चाटे यांचे आभार मानले. (वा. प्र.)