कोरोनावरील उपचारासाठी ६६ लाख ६१ हजारांचा आमदार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:22 AM2021-05-19T04:22:12+5:302021-05-19T04:22:12+5:30
करमाळा : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आमदार निधीतून ६६ लाख ६१ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आ. ...
करमाळा : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आमदार निधीतून ६६ लाख ६१ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत मतदार संघातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपजिल्हा रुग्णालय करमाळा व ग्रामीण रुग्णालय जेऊर यांच्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वैद्यकीय उपकरणे व साधनसामग्री खरेदी करण्यासाठी ६६ लाख ६१ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे.
करमाळा व जेऊर या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठी २७ लाख ७९ हजार, तसेच ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३८ लाख ८२ हजार अशी एकूण मतदारसंघासाठी ६६ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
----
करमाळा, जेऊरला ३६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
या निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र केम, कोर्टी, वरकुटे, साडे, पिंपळनेर व रोपळे (क) या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये ६ लाख ४७ हजार रुपये किमतीचे साहित्य खरेदी केले जाणार आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर - २, ऑक्सिजन जंबो सिलिंडर ५, ऑक्सिजन रेग्युलेटर २, ऑक्सिजन सेंट्रल सिस्टिम ६ अशी साधनसामग्री खरेदी केली जाणार आहे. एकूण ६ उपकेंद्रांसाठी प्रत्येकी ६ लाख ४७ हजार याप्रमाणे एकूण ३८ लाख ८२ हजार रुपयांची तरतूद प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी केली आहे.
उपजिल्हा रुग्णालय, करमाळा व ग्रामीण रुग्णालय, जेऊर या दोन्ही ठिकाणी जवळपास ३६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इतर सामग्रीसाठी ७९ हजार रुपयांची तरतूद केली आहे.