वीज कनेक्शन तोडणीवरून आमदार सातपुते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:55+5:302021-08-23T04:24:55+5:30
माळशिरस तालुक्यात बहुतांश ठिकाणी वीजबिल थकबाकीसाठी महावितरणकडून गावागावातील वाडी-वस्तीवरचे शेतीचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. काही ठिकाणी मुख्य लाईनवरून ...
माळशिरस तालुक्यात बहुतांश ठिकाणी वीजबिल थकबाकीसाठी महावितरणकडून गावागावातील वाडी-वस्तीवरचे शेतीचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. काही ठिकाणी मुख्य लाईनवरून रोहित्र सोडवले जात आहेत. त्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोरोनामुळे अगोदरच हातघाईला आलेला शेतकरी पार कोलमडून पडला आहे.
विहिरीत पाणी असूनही विजेअभावी पिके सुकून वाया चालली आहेत. इतकेच नव्हे तर पालकमंत्री दत्ता भरणे व सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुक्यातील झारगडवाडी येथील सभेत शिवाजी चितळकर नावाच्या शेतकऱ्याने व्यासपीठावरच वीज कनेक्शन तोडल्याबाबत दोरखंडाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हे महाविकास आघाडी सरकारचं शेतकरीविरोधी धोरण आहे. माळशिरस तालुक्यात वीज तोडणी खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा महावितरणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आ. राम सातपुते यांनी दिला आहे.