बार्शीला वैद्यकीय सेवा व सुविधा देण्यासाठी आमदार, प्रांताधिकारी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:55+5:302021-04-17T04:21:55+5:30
बार्शी : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामीण भागातील रुग्णांना जवळपासच उपचार मिळण्याकरिता पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत ...
बार्शी : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामीण भागातील रुग्णांना जवळपासच उपचार मिळण्याकरिता पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या पांगरीच्या ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडची उपलब्धता असून, पांगरी व जवळच्या १५ गावांतील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
पांगरी येथे ५० बेडच्या कोविड केअर सेंटरला आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट देऊन सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, पांगरीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रवींद्र माळी, डॉ. गायकवाड, ॲड. अनिल पाटील, विलास जगदाळे, सरपंच सुरेखा लाडे, उपसरपंच धनंजय खवले, ग्रामसेवक संतोष माने, संजीव बगाडे, सुहास देशमुख, सतीश जाधव, जयंत पाटील, रियाज बागवान, विलास लाडे उपस्थित होते.
----
फोटो : १६ वैराग
पांगरी झेडपी शाळेत ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्याची माहिती देताना आमदार राजेंद्र राऊत, प्रांताधिकारी हेमंत निकम.