आमदारांना काळजी मोहोळची की इंदापूरची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:56+5:302021-04-30T04:27:56+5:30
आ. माने हे मोहोळ तालुक्याचे आहेत की इंदापूरचे की बारामतीच्या मर्जीतील आमदार, त्यांना मोहोळ तालुक्यातील जनतेची काळजी आहे ...
आ. माने हे मोहोळ तालुक्याचे आहेत की इंदापूरचे की बारामतीच्या मर्जीतील आमदार, त्यांना मोहोळ तालुक्यातील जनतेची काळजी आहे की इंदापूर तालुक्यातील जनतेची, हेही त्यांनी त्यांनी स्पष्ट करावे, असे म्हटले आहे.
सध्या उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यात नेले जात असल्यावरून पालकमंत्री भरणे यांच्यावर टीका होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनीही टीका केली. मोहोळ तालुक्यातील जनतेने स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून आ. माने यांना निवडून दिले, मात्र आता ते पालकमंत्री भरणे यांच्या भूमिकेबद्दल काहीही बोलण्यास तयार नाहीत.
एकीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व जण चिंतेत असताना पालकमंत्री भरणे यांनी मात्र जनतेला दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यांची दिशाभूल करून पाणी चोरण्याचा कुटिल डाव खेळला आहे. याबद्दल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पालकमंत्री यांच्या या पाणीचोरीबद्दल सविस्तर निवेदन देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. उजनीचे पाणी हे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना कदापि चोरू देणार नाही, असे क्षीरसागर यांनी सांगितले.