पशु वैद्यकीय अधिका-यांची नेमणुक करण्याची मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:54+5:302021-02-11T04:23:54+5:30
मोडनिंब : शेतक-यांचे पशुधन वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी मोडनिंब मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी पशुसंवर्धन मंत्री ...
मोडनिंब : शेतक-यांचे पशुधन वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी मोडनिंब मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर किमान कंत्राटीवर भरती करण्याची मागणी केली.
सोलापूर जिल्हा हा शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर जीवन जगत आहे. अशातच जनावरे पाळून दूध व्यवसायही मोठया प्रमाणात चालू आहे. परंतू याच जिल्ह्यातील जनावरसाठी आवश्यक असणा-या दवाखान्यातील प्रमुख पदे रिक्त आहेत. या भागातील जनावरांवर उपचार करताना मोठया अडचणी येत आहेत. जिल्ह्यात जनावरांच्या दवाखान्यात रिक्त श्रेणी १ आणि श्रेणी २ ची पदाची त्वरीत भरती करा. पशुधन वाचवावे अशी मागणी केली. या मागण्या मान्य न केल्यास मनसे रस्तावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही प्रशांत गिड्डे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
----
फोटो : १० मोडनिंब
पशुवैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे