सोलापुरातील बांगलादेशवासीयांची मनसेकडून शोधमोहिम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:18 AM2020-02-29T11:18:19+5:302020-02-29T11:22:41+5:30

पूर्व भागातील ‘तो सर्व्हे’ तत्काळ बंद करा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकाºयांकडे मागणी

MNS search campaign for Bangladeshi people in Solapur | सोलापुरातील बांगलादेशवासीयांची मनसेकडून शोधमोहिम सुरू

सोलापुरातील बांगलादेशवासीयांची मनसेकडून शोधमोहिम सुरू

Next
ठळक मुद्देशासनामार्फत सुरू असलेला सर्व्हे बंद करण्याची मागणीविडी घरकूल परिसरात उडाला गोंधळ; परिस्थिती चिघळण्याची मास्तरांना भीती !संबंधित कर्मचाºयांना पोलीस ठाण्यात नेऊन केली चौकशी

सोलापूर : शहरातील पूर्व भागात शासनातर्फे सुरू करण्यात आलेला सर्व्हे तत्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर मनसेच्या  सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सोलापुरातील बांगलावासीय हुडकून काढावेत, अशी मागणी केली आहे. 

माजी आमदार नरसय्या आडम, नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, रशीदा शेख, चंदा गायकवाड, अकबर लालकोट, सलीम मुल्ला, शाहबोद्दीन शेख, सत्तार शेख  यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

देशभर सध्या सीएए व एनपीआरबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत आंदोलने होत असून, मोर्चे काढून नागरिकत्व कायद्याला विरोध केला जात आहे. अशा स्थितीत नागरी वस्तीत कोणीही जाऊन काही माहिती विचारल्यास नागरिक संशयाने बघत आहेत. 
२७ फेब्रुवारी रोजी दुपारी अक्कलकोट रोडवरील गांधीनगर झोपडपट्टीत दोन इसम मोबाईल  घेऊन घरोघरी माहिती संकलित करीत फिरत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यावर आम्ही जनगणनेचे कर्मचारी आहोत. आम्हाला सर्व्हे करण्याचे जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्याचे सांगितले. ओळखपत्र विचारल्यावर त्यांनी खासगी कंपनीचे ओळखपत्र दाखविले आहे. 
याबाबत अधिक चौकशी केल्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलीस कारवाई करू, अशी धमकी त्या कर्मचाºयांनी दिली. खातरजमा करण्यासाठी त्यांना एमआयडीसी पोलीस  ठाण्यात नेल्यावर त्या इसमांनी आपल्या वरिष्ठांना बोलाविले व पोलिसांना तोंडी माहिती देऊन ते निघून गेले. सर्व्हे करताना हे कर्मचारी नवीन कायदा मुस्लिमांसाठी आहे,  तुम्ही घाबरू नका असे इतरांना सांगत असल्याने गोंधळ होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण जनतेच्या मनात  भीती निर्माण करू शकते व परिस्थिती चिघळत जाण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यास बंदी घालावी. राजमुद्रेचा वापर करून ओळखपत्र वापरणाºया खासगी कंपनीच्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, असे आडम मास्तर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

सर्वेक्षणाला विरोध करू नये
- सोलापुरात शासनातर्फे सुरू असलेल्या कोणत्याही सर्वेक्षणाला विरोध करू नये. शहरातील हद्दवाढ भागात बांगलादेशीय मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून राहत असल्याची माहिती आहे. बांधकाम, फर्निचर, मिठाई या व्यवसायाच्या निमित्ताने बांगलादेशीय मोठ्या प्रमाणावर शहर आणि हद्दवाढ भागात राहावयास आले आहेत. यातील बºयाच घुसखोरांनी आता येथील कागदपत्रे बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अशा लोकांना संरक्षण देणे घातक आहे. त्यामुळे विनाकारण अशा सर्वेक्षणाला विरोध करून स्थानिक तरुणांच्या हक्काला बाधा आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. ज्या भागात असे नागरिक वास्तव्यास आहेत, त्या भागातूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बांगलावासीयांना हुडकून काढा, अशी मनसेची ठाम मागणी असल्याचे दिलीप धोत्रे यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

केंद्र शासनामार्फत दर पाच वर्षांनी आर्थिक गणना केली जाते. हे काम करण्याची जबाबदारी कॉमन सर्व्हिस सेंटरकडे दिली आहे. ही प्रक्रिया देशभरात गेल्या आठ महिन्यांपासून  सुरू आहे. यातून शासनाला दरवर्षी नवीन उद्योगाला चालना देण्याचे निर्णय घेता येतात. त्यामुळे सर्वांनी या गणनेला सहकार्य करावे.
- पुंडलिक गोडसे, 
जिल्हा सांख्यिकी अधिकारी

Web Title: MNS search campaign for Bangladeshi people in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.