दंड वसुलीविरोधात मनसेचे अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:45+5:302021-06-04T04:17:45+5:30

बार्शी : लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्यांवर बार्शी शहर व तालुक्यातील गोरगरीब वाहनधारकांकडून दंड वसूल केला जात आहे. ...

MNS's half-naked agitation against recovery of fines | दंड वसुलीविरोधात मनसेचे अर्धनग्न आंदोलन

दंड वसुलीविरोधात मनसेचे अर्धनग्न आंदोलन

googlenewsNext

बार्शी : लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्यांवर बार्शी शहर व तालुक्यातील गोरगरीब वाहनधारकांकडून दंड वसूल केला जात आहे. तो थांबवावा, या मागणीसाठी बार्शीत मनसेच्या वतीने शहर अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत अर्धनग्न ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

लॉकडाऊन काळात नगरपालिका, शासकीय अधिकारी, कर्मचारी दंडाची वसुली करताहेत. दंड न भरल्यास गाड्या जप्त करताहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णापर्यंत वेळेवर पोहोचता येत नाही. तसेच भाजी व फळविक्रेते यांनी लावलेला मास्क नाकावरून तोंडावर आला तर दंड वसूल करतात. हा दंड न दिल्यास वजनकाटे जप्त करतात. त्यामुळे ही दंडवसुली थांबवावी, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

----

फोटो : ०३ बार्शी स्ट्राईक

वाहनधारकांच्या दंडवसुलीविरोधात अर्धनग्न आंदोलन करताना मनसेचे बार्शी शहर अध्यक्ष राजेंद्र गायकवाड.

---

Web Title: MNS's half-naked agitation against recovery of fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.