मनसेचे सोलापूर, माढा लोकसभेतील काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळेल बळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:18 PM2019-04-12T16:18:41+5:302019-04-12T16:21:57+5:30
मराठी पाट्या, परप्रांतीयांचा रोजगार अशा अनेक प्रश्नांवर आक्रमकपणा दाखवणाºया मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर : दोन वर्षांपूर्वी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेची शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त झाली असली तरी अद्यापही या पक्षाकडे काही कार्यकर्त्यांची कुमक आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या उमेदवाराला या कार्यकर्त्यांचे थोडेबहुत बळ मिळू शकते, अशी स्थिती आहे.
मराठी पाट्या, परप्रांतीयांचा रोजगार अशा अनेक प्रश्नांवर आक्रमकपणा दाखवणाºया मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
दोन वर्षांपूर्वी सोलापूरसह अनेक ठिकाणी कार्यकारिणी बरखास्त केली़ त्यानंतर कार्यकर्ते आणि पक्ष वाढू शकला नाही.
या पक्षात गटबाजीही होत राहिली़ पक्षातील ही धुसफूस पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली; मात्र याकडे वरिष्ठांनीही लक्ष दिले नाही़ त्यानंतर पक्षाकडूनही फारसे कार्यक्रम आणि कामेदेखील होऊ शकली नाहीत.
उलट पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष आणि पक्षातील मरगळीला कंटाळून माजी शहराध्यक्ष युवराज चुंबळकर आणि उमेश रसाळकरसह जवळपास ५०० कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी सेनेत प्रवेश केला.
पक्षातील या दुफळीचा भाजप उमेदवारालाही काही प्रमाणात लाभ होणार आहे़ काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे़ सध्या तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे १५ एप्रिल रोजी होणाºया सभेकडेच लक्ष केंदित आहे.
जिल्हा परिषद, ग्रा़ पं़, पंचायतमध्ये प्रभाव दाखवला
- दुष्काळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सोलापूर जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली. अनेक कामेही केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघातील मनसे
- उमेदवार फारुक शाब्दी यांना २८,६०० मते पडली होती. काँंग्रेसच्या मतावर याचा परिणाम झाला होता. टाकळी जिल्हा परिषद सदस्य, नरखेड, वैराग,मोडनिंब, माळशिरस, इस्लामपूर,
- माढा तालुक्यातील लऊळ अशा अनेक ग्रामपंचायतींवर मनसेचे उमेदवार सदस्य म्हणून निवडून गेले आहेत त्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा काँग्रेस - राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.