शेळ्या-मेंढ्यांना लसीकरणासाठी फिरत्या वाहनाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:53+5:302021-06-05T04:16:53+5:30
सुनील केदार यांनी शुक्रवारी महूद येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ते ...
सुनील केदार यांनी शुक्रवारी महूद येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सांगोला तालुकाध्यक्ष राजकुमार पवार, युवक तालुकाध्यक्ष सुनील नागणे, डॉ. शशांक कांबळे, सोलापूर उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. नानासाहेब सोनवणे, प्रभारी सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष बोरकर, प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. पोपट कारंडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. उल्हास डोईफोडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल धुमाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सुनील केदार म्हणाले, महुद येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी-शेळी विकास प्रक्षेत्राची धारण क्षमता ५ हजार केली जाईल. त्याचबरोबर सांगोला येथील पशुचिकित्सालयाच्या जागेमध्ये सुरक्षा भिंत उभारून त्या ठिकाणी जिल्हास्तरीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करून राज्यस्तरीय माडग्याळ मेंढीचे प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे. तर जवळा येथे स्वतंत्र महामंडळाचे ११ वे प्रक्षेत्र निश्चित करून त्याठिकाणी माडग्याळ जातीच्या मेंढीच्या पैदास केंद्राची स्थापना केली जाईल, असे सांगितले.
पशुधन विमा योजना पुनश्च: सुरू करण्यासंदर्भात ८ जूनला मंत्रालयातील बैठकीत हा विषय चर्चेला घेण्यात येणार आहे. ‘सानेन’ ही दूध देणारी शेळी आयात करून त्याचे पैदास केंद्र महाराष्ट्रात विविध ठिकाणी चालू करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रक्षेत्रांच्या जागेवर फलक लावावेत
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकुमार पवार यांनी सांगोला शहर व तालुक्यातील ज्याठिकाणी शेळी-मेंढी पालन प्रक्षेत्रांच्या जमिनी जागा आहेत, त्याठिकाणी तसे फलक लावावेत, अशी मागणी केली. यावेळी मंत्री सुनील केदार यांनी फलक लावण्यासंर्दभात जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
फोटो ओळ :::::::::::::
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी महुद येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पवार आदी.