सबसिडीत कपात करून सर्वसामान्यांची थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:36+5:302021-02-07T04:20:36+5:30
दोन वर्षांपूर्वी १४ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी ५०० ते ६०० रुपये दर आकारला जात होता. यात प्रत्येक तारखेस कमी-अधिक किंमत ...
दोन वर्षांपूर्वी १४ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी ५०० ते ६०० रुपये दर आकारला जात होता. यात प्रत्येक तारखेस कमी-अधिक किंमत आकारली जात होती. या गॅसच्या सबसिडीपोटी ग्राहकांच्या खात्यात २०० ते ३०० रुपये जमा केले जात होते. नोव्हेंबर २०२० मध्ये १४ किलो सिलेंडरची किंमत ६०३ रुपये तर डिसेंबरमध्ये ७०३ रुपयापर्यंत सिलेंडरची किंमत पोहोचली. एकाच महिन्यात तीन-तीन वेळा गॅस दरवाढीचा उच्चांक निर्माण झाला आहे.
४ फेब्रुवारी रोजी २० रुपयांची वाढ झाल्याने गॅस सिलेंडरचा दर ७२३ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या वर्षभरात प्रत्येक गॅस सिलेंडरमागे २०० ते ३०० रुपयांची सबसिडी दिली जात होती. त्यामुळे सहाशे रुपयांचा गॅस ग्राहकांना ४०० ते ४५० रुपयांना मिळत असल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळत होता. परंतु डिसेंबर २०२० मध्ये एकाच महिन्यात तीनवेळा तर ४ फेब्रुवारीला २० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे गॅस सिलेंडरचा दर आता ७५० रुपयांवर गेला आहे. परंतु ग्राहकांना दिले जाणारे अनुदान केवळ तीन रुपये खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांची थट्टा सुरू झाली आहे.