आधुनिक नवदुर्गा; हाती पाना, हातोडा घेऊन महिला करतायेत मेकॅनिकगिरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:41 PM2019-09-30T14:41:53+5:302019-09-30T14:46:51+5:30

एसटी आगारात महिला राज : ‘हम भी किसीसे कम नही’ दाखविण्यासाठी क्षेत्रात आल्याचे मनोगत

The modern novel; Wrap hands, women with hammers are doing mechanics! | आधुनिक नवदुर्गा; हाती पाना, हातोडा घेऊन महिला करतायेत मेकॅनिकगिरी !

आधुनिक नवदुर्गा; हाती पाना, हातोडा घेऊन महिला करतायेत मेकॅनिकगिरी !

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला पुरूषांपेक्षा कमी आहेत असे समजणाºयांसाठी ही आजची विशेष स्टोरी. महिला मेकॅनिकही पुरूषांच्या इतकेच सरस काम करत या क्षेत्रात उतरल्या आहेतमेकॅनिक व्यवसायात आतापर्यंत असलेली पुरूषांची मक्तेदारी आता संपुष्टात येत आहे

रुपेश हेळवे

सोलापूर : पूर्वी महिला केवळ गृहिणी असायची; पण शिक्षणाचा प्रसार झाला अन् बँकिंग, टेलिकॉम आणि अन्य क्षेत्रात महिला पुरूषांच्या तोडीस तोड काम करू लागल्या. ‘एसटी’मध्येही अशीच क्रांती घडली. अधिकारी, क्लार्क पदावर काम करता करता महिलांनी कंडक्टर म्हणूनही जबाबदारी स्वीकारण्यास सुरूवात केली; पण मेकॅनिक हे क्षेत्र मात्र निव्वळ पुरूषप्रधान होतं. अलीकडे येथेही हातात पाना, हातोडा घेऊन या नवदुर्गा प्रभावीपणे काम करू लागल्या आहेत. ‘हम भी किसीसे कम नही’ हेच त्या आपल्या कामातून दाखवून देत आहेत.

महिला पुरूषांपेक्षा कमी आहेत असे समजणाºयांसाठी ही आजची विशेष स्टोरी. आतापर्यंत मेकॅनिक असो वा कंडक्टर आपण पुरूषांनाच पाहिले असेल़ अचानक गाडी बंद पडली की गॅरेजवाल्यास बोलावल्यावर लगेच पुरूष मेकॅनिक आलेले आपण अनेक वेळा पाहिले असेल, पण आता महिला मेकॅनिकही पुरूषांच्या इतकेच सरस काम करत या क्षेत्रात उतरल्या आहेत़ यामुळे मेकॅनिक व्यवसायात आतापर्यंत असलेली पुरूषांची मक्तेदारी आता संपुष्टात येत आहे़ याचबरोबर एखाद्या एसटीमध्ये जाताना एखादी महिला वाहक आपल्याला तिकीट विचारेल अशी कल्पनाही आपण करणार नाहीत, पण आता या क्षेत्रातही महिला उतरल्या आहेत़ एवढेच नाही तर सर्वात जास्त सार्वजनिक दळणवळण असणाºया वाहतूक क्षेत्रात चालक म्हणूनही महिलांनी आत पाय ठेवले आहे़ यामुळे असे कोणतेच क्षेत्र नाही की जिथे महिला काम करू शकत नाहीत़ यामुळे आज या आधुनिक नवदुर्गांची ही विशेष माहिती.

सोलापूर एसटी डेपोमध्ये ७ महिला मेकॅनिक क्षेत्रात काम करत आहेत़ एवढेच नाही तर जेवढे काम एखादा पुरूष कर्मचारी करतो तेवढेच काम या महिला करत असतात़ एसटीमध्ये तीन महिन्याला प्रत्येक एसटीची पूर्ण देखभाल केली जाते़ याला डॉकिंग म्हटले जाते़ स्पिंग बदलणे, क्लचप्लेट बदलणे, टायर बदलणे, इंजिनमधील काही तांत्रिक बिघाड असेल तर दुरूस्त करणे़ इलेक्ट्रिशियनचे काम करणे़ याचबरोबर गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी पंपावरही त्या काम करतात.

आतापर्यंत या क्षेत्रात महिला येत नव्हत्या़ यामुळेच मी या क्षेत्रात आले़ मी गेल्या १० वर्षांपासून या विभागात काम करते़ गाडीचे कोणतेही काम असो टायर बदलण्यापासून ते इंजिनमधील बिघाड शोधून दुरूस्त करण्याचे आदी कामही मी करते़ यामध्ये सर्व सहकारी मला चांगल्या प्रकारे मदत करत असतात़ हे सर्व करत असताना घरची जबाबदारीही मी चोख निभावते़ यामुळे कुटुंबीयांची साथही मला मिळते़ हब बाहेर काढणे, टायर बदलणे हे जड काम मानले जात होते, हे कामही आम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने करतो़
- वंदना निंबर्गीकर, सहायक कारागीर 

मी पहिल्या दिवशी जेव्हा कामावर आले होते, हे काम पाहून मी नाराज झाले होते़ पण माझ्या महिला सहकाºयांनी मला समजून सांगितले़ आता मात्र हे काम मला काहीच वाटत नाही़ आता गाडी कुठे रस्त्यात बंद पडली तरी आम्ही जागेवर जाऊन ती दुरूस्त करतो़ महिलांची संख्या या क्षेत्रात खूप कमी होती़ यामुळे या क्षेत्रात आपली चुणूक दाखवावी आणि हम भी किसीसे कम नही हे दाखविण्यासाठी मी हे क्षेत्र निवडले आहे़ 
- प्रज्ञा जामगेकर, सहायक 

आम्हाला अभिमान आहे की आम्ही वाहक या क्षेत्रात आलो आहेत़ आतापर्यंत ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा काम करताना पाहिले त्या सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे़ कारण या क्षेत्रात पुरूषांना पाहण्याची त्यांची सवय आम्ही मोडून काढली आहे़ आम्ही या क्षेत्रात आल्यामुळे आम्हालाही या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळते़ याचबरोबर आमची प्रेरणा घेऊन चूल आणि मूल सांभाळणाºया महिलाही बाहेर पडतील हा या मागचा उद्देश घेऊन हे क्षेत्र आम्ही निवडले़ याचबरोबर आम्हाला या क्षेत्रात सर्व अधिकारी आणि सहकाºयांचे सहकार्य मिळते.
- स्वाती गवळी, स्वाती काळे, सुवर्णा रजपूत, 
सुनीता पाडवी, सुवर्णा ढाले
 (सर्व वाहक)

Web Title: The modern novel; Wrap hands, women with hammers are doing mechanics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.