मोदी सरकारला काश्मीर सांभाळता येत नाही : सुशिलकुमार शिंदे
By admin | Published: June 23, 2017 10:52 PM2017-06-23T22:52:56+5:302017-06-23T22:52:56+5:30
रोजचं वर्तमान पत्र उघडलं की, काश्मीरमध्ये भारतीय सैनिक शहीद झाल्याची बातमी वाचायला मिळते, नंदनवनात रोज एक सैनिक मृत्यू पावतो़
Next
>
आॅनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - रोजचं वर्तमान पत्र उघडलं की, काश्मीरमध्ये भारतीय सैनिक शहीद झाल्याची बातमी वाचायला मिळते, नंदनवनात रोज एक सैनिक मृत्यू पावतो़, हे अत्यंत वाईट आहे. मोदी सरकारला काश्मीर सांभाळता येत नाही असा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सायंकाळी एका साहित्य पुरस्कार वितरण समारंभात बोलताना केला़.
ते पुढे बोलताना म्हणाले की, काश्मीरमध्ये भारतीय सैनिक शहीद होत आहेत आणि हे तिकडे दिल्लीत निवांत आहेत. आम्ही काश्मीरबाबत काय केले हे सांगण्याची आता गरज नाही़. इंदिरा गांधीनी बांगलादेशची निर्मिती केली़ पण त्याच बरोबर त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाबरोबर संवाद साधत होत्या़. मोदी सरकार मात्र संवाद सोडून परिस्थिती बिघडवायचे काम का करत आहेत असा सवालही त्यांनी केला.