मोदी सरकारने हमीभाव योजनेतही केली फसवणूक - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:13 PM2018-07-05T12:13:53+5:302018-07-05T12:18:44+5:30
ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी त्वरित देण्याची मागणी
सोलापूर : मोदी सरकारनं मोठा गवगवा करून शेतकºयांसाठी जाहीर केलेला खरीप पिकांचा हमीभाव फसवा आहे. शेतकºयांचा उत्पादन खर्च हा २५ टक्क्यांवर पोहोचलेला असताना केंद्र सरकारने केवळ वीस टक्के एमएसपी म्हणजे हवीभावात वाढ केली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या योजनेतही पुन्हा शेतकºयांची फसवणूक होणार आहे, अशी माहिती खा़ राजू शेट्टी यांनी सोलापूरात बोलताना दिली़
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी सरकार शेतकºयांच्या बाबतीत नेहमीच दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप करीत दिवसेंदिवस दुधाचे दर कमी होत चाललेले असताना ठोस भूमिका घेताना दिसत नाही. यामुळे दूध उत्पादकांना आपली जनावरे वाºयावर सोडून देण्याची वेळ आली आहे. शेजारच्या कर्नाटकात प्रतिलिटर ४ रुपये दिले जात आहेत. आंध्र, तेलंगणाचीही सकारात्मक भूमिका आहे. महाराष्टÑातील सरकार मात्र काहीच करायला तयार नाही याबद्दल संताप व्यक्त केला.
राज्यात गायीच्या दुधाचे तब्बल १ कोटी ५ लाख लिटरच्या आसपास संकलन होते. प्रत्यक्षात महिन्याला दीडशे कोटी लिटरची गरज आहे. शासनाने या पशुपालकांना मदत दिली तर सुरळीत होणार आहे, मात्र सरकारची शेतकºयांच्या बाबतीत मदत करण्याची मानसिकता नाही. दूध संघाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान दिले गेले, मात्र त्यांनी ते अन्यत्र वळवले आहे.
दूध उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावेत ही आमची आग्रही मागणी आहे. याशिवाय ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी २ हजार कोटी रुपये आहे तीही देण्यात यावी, अन्यथा १६ जुलैपासून राज्यभरातून दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खा.शेट्टी यांनी दिला.
सरकारच्या लाडक्या मुंबईसाठी एक थेंबही दुधाचा पुरवठा होणार नाही दूध उत्पादक शेतकरी भले हे दूध वारीतल्या वारकºयांना, गोरगरिबांना देऊन त्यांचा दुवा घेईल पण स्वस्थ बसणार नाही, असेही शेट्टी यांनी सूचित केले.
१६ जुलैपासून दूध बंद आंदोलन
दुधाला हमीभाव मिळवून देणे हे सरकारचे काम आहे. मात्र त्यांना काहीच करायचे नाही. अन्य राज्यांतील सरकार दूध उत्पादकांच्या बाबतीत सकारात्मक असताना महाराष्टÑ शासन मात्र उदासीन धोरण अवलंबत आहे. सरकारला शांततेची भाषा कळत नाही म्हणून येत्या १६ जुलै २०१८ पासून दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली २ हजार कोटी रुपये थकबाकी तातडीने द्यावी या मागणीसाठी दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेद्वारे दिला.
दोन्ही बाजूने शेतकºयांचीच गोची
- केंद्र सरकारने हमीभाव वाढवले असले तरी वाढीव भाव नेमका कुणी द्यायचा हाही मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले असले तरी सरकार हमीभावाने शेतकºयांचा माल खरेदी करत नाही आणि बाजारपेठेतील व्यापारीही हमीभाव देत नाही. अशा स्थितीत शेतकºयांचीच गोची होते. शेतीमालाचे उत्पादन घेताना खर्चातही २० ते २५ टक्के वाढ झालेली आहे. आणि दरवाढही तेवढ्याच प्रमाणात झाली आहे. म्हणजे शेतकºयांच्या हाती काहीच नाही. मग त्यांनी करायचे काय? असा सवालही खा. शेट्टी यांनी सरकारला केला.