सुशीलकुमारांच्या जिल्ह्यात ‘मोहन’ प्रकाश!

By Admin | Published: June 8, 2014 12:48 AM2014-06-08T00:48:00+5:302014-06-08T00:48:00+5:30

विधानपरिषद नियुक्ती: शिंदेंच्या उमेदवाराला डावलले

'Mohan' light in Sushil Kumar's district! | सुशीलकुमारांच्या जिल्ह्यात ‘मोहन’ प्रकाश!

सुशीलकुमारांच्या जिल्ह्यात ‘मोहन’ प्रकाश!

googlenewsNext

सोलापूर:
घर फिरले की घराचे वासेही फिरतात, असा काहीसा प्रकार सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबतीत घडत आहे़ विधानपरिषदेसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी सुचविलेल्या नावाला विरोध करीत काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी स्वत:चा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे़
विधानपरिषदेतील सुभाष चव्हाण यांची जागा रिक्त झाली आहे़ चव्हाण यांचे नाव सुशीलकुमार शिंदे यांनीच सुचविले होते़ त्यामुळे रिक्त जागेवर सुशीलकुमार शिंदे समर्थकांची वर्णी लागावी, अशी अपेक्षा होती़
शिंदे यांनी सोलापुरातील विष्णुपंत कोठे आणि बाळासाहेब शेळके यापैकी एकाला संधी देण्यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे शिफारस केली होती़
मोहन प्रकाश यांनी अचानकपणे प्रदेशचे सचिव अ‍ॅड़ रामहरी रुपनवर यांचे नाव यादीत घुसडले़ सोलापूर जिल्ह्यात शिंदे यांचा दबदबा असताना मोहन प्रकाश यांनी रुपनवर यांचे नाव पुढे रेटल्याने शिंदे यांनाच एकप्रकारे त्यांनी शह देण्याचा प्रयत्न केला आहे़ रुपनवर हे भाजपातून आले असल्याने जिल्ह्यातील काँग्रेसजनांनी त्यांची शिफारस केली नव्हती़ मात्र प्रदेश कार्यालयात सतत राबता असल्याने रुपनवर यांनी श्रेष्ठींची मने काबीज करण्यात यश मिळविले़
आता विधानपरिषदेच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे आणि मोहन प्रकाश यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात विधानपरिषदेचे दान पडणार याविषयी पक्षात आणि सोलापूर जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे़ मोहन प्रकाश यांनी यादीत घोळ घातल्याने शिंदे समर्थक अस्वस्थ झाले आहेत़
--------------------------------
आणखी तिघांचा अर्ज
अटकेच्या भीतीने विस्तार अधिकारी भानुदास क्षीरसागर (रा. रामलिंग सोसायटी, सोलापूर), स्वाती सुहास गायकवाड (शिक्षक सोसायटी), सौंदणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नित्यानंद कुलकर्णी या तिघांनी अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. सोमवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी होईल.

Web Title: 'Mohan' light in Sushil Kumar's district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.