मोहिनी चव्हाणला सुवण
By Admin | Published: January 2, 2015 10:47 PM2015-01-02T22:47:30+5:302015-01-02T23:58:14+5:30
वेटलिफ्टिंग मध्ये यश: युवा आशियाई क्रीडा स्पर्र्धा
जत : तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचालित महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोहिनी धरेप्पा चव्हाण (वय १७) हिने कतार येथे सुरू असलेल्या युवा आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४४ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. मोहिनी चव्हाण हिच्या रूपाने वेटलिफ्टिंगमध्ये जत तालुक्याला प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे.
मोहिनी चव्हाण ही इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. कतार येथे सुरू असलेल्या युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिने गुवाहाटी (पंजाब) येथे प्रशिक्षण घेतले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सतरा किलो वयोगटाच्या मुली आणि मुलांच्या सामूहिक स्पर्धेत १३१ किलोग्रॅम वजन उचलून तिने सुवर्णपदक मिळविले आहे.
मोहिनी चव्हाण हिचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर प्राचार्य एस. के. होर्तीकर यांनी तिची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. काही दिवसातच तिचे क्रीडाशिक्षक एस. व्ही. नांदणीकर आजारी आहेत. अशा अडचणी असूनही प्राचार्य होर्तीकर यांनी तिला गुवाहाटी (पंजाब) येथे प्रशिक्षण घेण्यास पाठविले होते. मोहिनी हिला एक भाऊ, बहीण असून,तिची आई प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका आहे.