मोहिते-पाटलांचा राजीनामा; नव्या समीकरणांची नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:10+5:302021-03-30T04:12:10+5:30
२०१७ मध्ये मोहिते-पाटील गटाला पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळाले. पुढे डिसेंबर २०१९ मध्ये अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी उपसभापती म्हणून पदभार ...
२०१७ मध्ये मोहिते-पाटील गटाला पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळाले. पुढे डिसेंबर २०१९ मध्ये अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी उपसभापती म्हणून पदभार स्वीकारला. या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये तालुक्यात मोठे राजकीय बदल होत गेले. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत.
पंचायत समितीच्या माध्यमातून मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार, कोरोना काळात अन्नधान्य वाटप, बांधकाम कामगार योजना, पाणीपुरवठा, अहिल्या सिंचन योजना, गाई गोठा, कृषी महोत्सव, अपंग मेळावे, मनरेगाच्या योजना, प्रधानमंत्री आवास आदी योजना प्रभावीपणे राबवत राज्यात ठसा उमटवला. त्यामुळे अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची कारकीर्द महत्त्वाची ठरली. याशिवाय तालुक्याच्या पश्चिम भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या उपसभापती पदाचा राजीनामा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.