मोहोळ तालुक्यात १७ गावांतील १२३ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:44+5:302020-12-25T04:18:44+5:30

दरम्यान २५ डिसेंबर रोजी नाताळ,२६ व २७ रोजी शनिवार व रविवार असल्याने तीन दिवस अर्ज भरण्यासाठी सुट्टी आहे. यामुळे ...

In Mohol taluka, 123 candidates from 17 villages filed applications | मोहोळ तालुक्यात १७ गावांतील १२३ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

मोहोळ तालुक्यात १७ गावांतील १२३ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

Next

दरम्यान २५ डिसेंबर रोजी नाताळ,२६ व २७ रोजी शनिवार व रविवार असल्याने तीन दिवस अर्ज भरण्यासाठी सुट्टी आहे. यामुळे सोमवारनंतर फक्त तीन दिवस बाकी राहणार आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.

चौकट-

मोहोळ तालुक्यातील ७६ पंचायतींच्या निवडणुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, महसूल सहाय्यक एल. एन. शेख, महेश कोटीवाले यांनी शहरातील शासकीय धान्य गोडाऊनमध्ये ७६ ग्रामपंचायतींचे वेगवेगळे बुथ तयार करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. ७६ ग्रामपंचायतींसाठी ३९ निवडणूक निर्णय अधिकारी व ७९ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह इतर १५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अर्ज भरण्याच्या ठिकाणी निवडणूक चिन्ह, निवडणूक अधिकारी यांचे संपर्क नंबर व नामनिर्देशन पत्र याबद्दल सर्व माहितीचे डिजिटल लावण्यात आले आहेत.

Web Title: In Mohol taluka, 123 candidates from 17 villages filed applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.