मोहोळ तालुक्यात पावसाने शंभरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:28 AM2021-09-09T04:28:07+5:302021-09-09T04:28:07+5:30
सोलापूर जिल्ह्याचा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ४८१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ४२४.४ मि.मी. म्हणजे ...
सोलापूर जिल्ह्याचा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ४८१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ४२४.४ मि.मी. म्हणजे ८८.२ टक्के पाऊस पडला आहे. मोहोळ तालुक्याची वर्षभरात सरासरी ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ४६१ मि.मी.इतका पाऊस पडला आहे. १००.८ टक्के पाऊस बुधवारपर्यंत पडला आहे.
याशिवाय उत्तर सोलापूर तालुका ९६.५ टक्के, मंगळवेढा ९२.९ टक्के, बार्शी ९२.२ टक्के, दक्षिण सोलापूर ९१.२ टक्के इतका पाऊस पडला आहे.
........
करमाळ्यात सर्वात कमी पाऊस
वर्षभराच्या पावसाच्या सरासरीची आकडेवारी पाहिली असता सर्वात कमी ७४.१ टक्के पाऊस करमाळा तालुक्यात पडला आहे. अक्कलकोट, सांगोला, माळशिरस, पंढरपूर व माढा तालुक्यात ८० ते ९० टक्के दरम्यान पावसाची नोंद झाली आहे.
..................
पुणे जिल्ह्यात वर्षभरात (जून ते सप्टेंबर) ८६१.६ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना आतापर्यंत ५९८ मि.मी. म्हणजे ६९.६ टक्के पाऊस पडला आहे. सांगली जिल्ह्यात वर्षभरात ५१४. ५ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६३२ मि.मी. म्हणजे १२२.९ टक्के पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात ८०० मि.मी. ९०.३ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ४२४ मि.मी. म्हणजे ८८.२ टक्के तर कोल्हापूर जिल्ह्यात १३३० मि.मी. ७६.६ टक्के इतका पाऊस पडला आहे. पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा व स्वाती ही नक्षत्रे शिल्लक असली तरी १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात पाऊस दरवर्षी पडतो.