मोहोळ : २१४७ पैकी ७३८ उमेदवारांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:24+5:302021-01-08T05:11:24+5:30
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण २१६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ३१ डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननीमध्ये १९ अर्ज अवैध ...
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण २१६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ३१ डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननीमध्ये १९ अर्ज अवैध होऊन २१४७ अर्ज पात्र ठरले होते. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकूण ७३८ जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यानंतर १४०९ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असणार आहेत.
अर्ज माघारी घेण्याच्या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे, महसूल सहाय्यक एल.एन. शेख, महेश कोटीवाले, योगेश अनंत कवळस, संजय गोटीवाले, मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक यांनी परिश्रम घेतले.
बिनविरोध ग्रामपंचायती
अनगर/कोंबडवाडी १७, बिटले ९, खंडोबाचीवाडी ९, कुरणवाडी (अ) ९, सिद्धेवाडी ७, तेलंगवाडी ७, पासलेवाडी/गलंदवाडी ९, नालबंदवाडी ७, वाघोली/वाडी ११, वडवळ ९, शिरापूर (मो) ७, पीरटाकळी ७, आढेगाव ९ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये चुरस
आता तालुक्यातील राजकीय सत्ताकेंद्र असणाऱ्या पेनूर, नरखेड, शेटफळ, लांबोटी, बेगमपूर, कुरुल, टाकळी सिकंदर, पाटकुल या गावांमध्ये चुरशीने निवडणुका होण्याची शक्यता आहे.
फोटो
०४मोहोळ-जल्लोष
ओळी
श्रीक्षेत्र नागनाथ महाराजांचे स्थान असणारे वडवळ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर दोन्ही गटाच्या सदस्यांनी मंदिरासमोर जल्लोष केला.