ओलावा हटेना, मुळ्या वाढेना, द्राक्षाचे घड गळू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:10+5:302020-12-05T04:47:10+5:30
तालुक्यात जवळपास ७०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे अजूनही जमिनीत क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ओलावा टिकून राहिलेला आहे. त्यामुळे ...
तालुक्यात जवळपास ७०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे अजूनही जमिनीत क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ओलावा टिकून राहिलेला आहे. त्यामुळे उभ्या झाडावरील घड गळू लागले आहे. हा प्रकार बागायतदारांची चिंता वाढवित आहे.
तालुक्यातील काही शेतकरी एकत्रित येत ग्रुप तयार केला. या सर्वांनी द्राक्ष शेती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रत्येकाने बँक कर्ज मिळवून देण्यापासून ते मजूर पुरविणे, रोगराईवर औषध फवारणी, यंत्रसामग्री देणे अशा प्रकारचे एकमेकांना साहाय्य करीत बागा फुलू लागल्या. शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होत गेली. परिणामी द्राक्षबागांची संख्या वाढू लागली. पण गतवर्षी तालुक्यात द्राक्षमाल अत्यंत चांगल्या पद्धतीने आला, मात्र कोरोनामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. काही शेतकऱ्यांनी बेदाणा केला. तरी बँकेच्या कर्जावरील व्याजसुद्धा निघाले नाही.
यावर्षी अतिवृष्टीमुळे ऑक्टोबर महिन्यातील छाटणीला विलंब झाला. चित्रा नक्षत्राच्या पावसामुळे जमिनीत ओलावा अधिक प्रमाणात झाला. अजनूही वापसा येईना. जमिनीतील अन्नद्रव्य घटक धुवून गेले. जमिनीतील मुळ्या योग्य पद्धतीने वाढताना दिसत नाहीत. यामुळे यंदा द्राक्षाचे घड प्रमाणापेक्षा अधिक गळू लागले आहेत. एकूणच रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधासाठी खर्च करावा लागत आहे.
या भागात आहेत बागा
तालुक्यातील नागणसूर, जेऊर, तडवळ, करजगी, सदलापूर, शिरवळ, मैंदर्गी, दुधनी, हंजगी, तोळणूर, चप्पळगाव, हन्नूर, चुंगी, उडगी, सलगर, अक्कलकोट आदी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष पीक घेतले आहे.
कोट ::::::::
यंदाच्या अतिवृष्टी, कोरोनाचे संकट यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन नियोजन बिघडले आहे. द्राक्ष शेतीमुळे रोजगार निर्मिती होत असतानाही शासनाने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानभरपाई यादीत द्राक्षाला वगळले आहे. तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई द्यावी. तसेच कर्जावरील किमान दोन वर्षाचे व्याज माफ करावे.
फोटोओळ
०४अक्कलकोट०१
अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे उशिरा छाटणी झालेले बागा.